Asim Sarode News : असीम सरोदेंचं फडणवीस अन् बावनकुळेंना 'या' मुद्यावर Open Challenge !

Adv. Asim Sarode Challenge to Fadnavis and Bawankule : एवढंच नाहीतर असीम सरोदे यांनी फडणवीस आणि बावनकुळेंना खोटारडे असल्याचंही म्हटलं आहे.
Asim Sarode  Challenge to Fadnavis and Bawankule
Asim Sarode Challenge to Fadnavis and BawankuleSarkarnama

नुकत्याच झालेल्या लोकसभेत भाजपच्या 'एनडीए' ला केंद्रात काठावरचे का होईना बहूमत मिळाले. पण, महाराष्ट्रात त्यांच्या महायुतीची मोठी पिछेहाट झाली. त्यामागे ते संविधान बदलणार असल्याचा विरोधकांचा प्रचार हे महत्वाचे कारण ठरले, असा बचाव भाजपने केला.

मात्र, तो खोटा असल्याचे सांगत त्यांनी संविधान कसे बदलले आहे. यावर थेट चर्चेचे खुले आव्हान निर्भय बनो आंदोलनातील प्रसिद्ध विधीज्ञ अ‍ॅड.असीम सरोदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना शनिवारी दिले. तसेच खोटारडे कुठले म्हणत ते या मुद्यावर खोटे बोलत असल्याचेही सांगितले.

दरम्यान, अ‍ॅड. सरोदेंनी(Asim Sarode) दिलेल्या आव्हानाचा ठोसपणे कायदेशीर प्रतिवाद करता येणार नसल्याने ते फडणवीस आणि बावनकुळे स्वीकारण्याची शक्यता कमी आहे. त्यात चार महिन्यांनी होणाऱ्याा विधानसभेचे पडघम आताच राज्यात वाजू लागले आहे.

या ही निवडणुकीला संविधान तथा घटना बदलाचा मुद्दा अडचणीचा ठरण्याची शक्यता गृहित धरून त्यावर भाजप वाद वाढविण्याची शक्यता नाही. उलट या मुद्यासह लोकसभेला अडचणीचा ठरलेला मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर काय केले, हे मराठा आमदारांनी ठासून मांडावे, अशी सूचना लोकसभा पराभवाच्या मंथन बैठकीत फडणवीसांनी नुकतीच केली आहे.

Asim Sarode  Challenge to Fadnavis and Bawankule
Rahul Kalate News: राहुल कलाटेंनी पुन्हा विधानसभा लढवली, तर चिंचवडला काय होणार?

'अब की बार चार सौ पार'च्या घोषणनेही भाजपला लोकसभेला देशात थोडे, तर राज्यात पूर्ण बॅकफूटवर आणले. चारशे पेक्षा जास्त जागा मिळवून भाजप संविधान बदल करणार असल्याचा विरोधकांचा प्रचार यशस्वी झाला. त्याला निर्भय बनोचीही साथ मिळाली. त्यांनीही घेतलेल्या सभांत या मुद्यावरच भर दिला.

त्यामुळे घाबरलेल्या दलित आणि मुस्लिम मतांनी राज्यात भाजप विरोधात, तर महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान केले. या घटकाने देशात इंडिया आघाडीच्या झोळीत आपली मते टाकली. त्यामुळे हाच मुद्दा आपल्या अपयशाला कारणीभूत ठरला, हेच नॅरेटीव्ह विरोधकांनी आणि निर्भय बनो यांनी सेट केल्याचा फटका बसला, त्याचे उत्तर आता द्यावे लागेल.' असे फडणीस(Devendra Fadnavis), बावनकुळे नुकतेच म्हणाले आहेत.

दरम्यान, आपल्या अपयशामागील वरील नॅरेटीव्हचा फडणीसांचा मुद्दा सरोदेंनी खोडून काढला. संविधान न बदलता सुद्धा भाजपने संविधानविरोधी बदल केले आहेत. हा,जर अप्रचार असेल, नॅरेटीव्ह सेट करणे असेल, तर फडणवीस आणि बावनकुळेंनी(Chandrashekhar Bawankule) माझ्याशी जाहीर संवाद करावा,असे आव्हान त्यांनी ट्विट करीत दिले.

Asim Sarode  Challenge to Fadnavis and Bawankule
Ajit Pawar : लोकसभा निकालानंतर अजितदादांचे आमदार अलर्ट! अधिवेशनात 'हॉट इश्यू' लावून धरणार...

तसेच या दोघांना खोटारडे असे संबोधत ते या मुद्यावर खोटे बोलत असल्याचेही सांगितले. तर, यासंदर्भात सरकारनामाशी अधिक बोलताना सरोदेंनी भाजप व संघ (आरएसएस) हे घटना बदलविण्याचा प्रयत्न करतात असे सांगत, 370 या घटनेतील कलमाची दुरुस्ती हे त्याचे उदाहरण आहे,अशा बदलांची यादीच आपल्याकडे आहे असे ते म्हणाले. निवडणुका येतील, जातील पण संविधान जिवंत राहिले पाहिजे, असे ते ठासून म्हणाले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com