अनिल परबांनी दाखवला वकिली बाणा

रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्या आरोपांवर अनिल परबांची (Anil Parab) प्रतिक्रीया
Anil Parab- Ramdas Kadam

Anil Parab- Ramdas Kadam

Sarkarnama 

Published on
Updated on

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम (Ramdas kadam) यांनी आज पत्रकार परिषदेत परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. अनिल परब (Anil Parab) कोकणात पक्ष संपवायला निघालेत, ते गद्दार आहेत, असे आरोप केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना वाचा फुटली आहे. रामदास कदम यांनी केलेल्या आरोपांवर अनिल परब यांना त्यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी सावध पवित्रा घेत कोणतीही प्रतिक्रिया देणं टाळलं आहे.

"मला रामदास कदमांच्या आरोपांवर काहीही बोलायचं नाही. ते शिवसेनेचे नेते आहेत आणि पक्ष त्यावर बोलेल. मला यावर काहीही बोलायचं नाही", असं म्हणत अनिल परब यांनी रामदास कदमांच्या आरोपांवर बोलण्यास टाळलं आहे.

<div class="paragraphs"><p>Anil Parab- Ramdas Kadam</p></div>
`मी कडवट शिवसैनिक.. गद्दार म्हटल्याने माझ्या डोळ्यांत पाणी आले`

रामदास कदमांचे आरोप ?

अनिल परब शिवसेनेच्या मुळावर उठले आहेत. कोकणातून शिवसेना संपवण्यासाठी ते मला आणि माझ्या मुलाला संपवायला तीन दिवस ठाण मांडून बसले आहेत. पण रत्नागिरीचे पालकमंत्री असूनही १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी सोडता ते कधीही जिल्ह्यात येत नाहीत, त्यांचे जिल्ह्याकडे लक्ष नाही. रत्नागिरीतील मतदार संघ आणि नगरपंचायती राष्ट्रवादीच्या घशात घालायला निघालेत असा आरोपही त्यांनी केला आहे.

यावेळी बोलताना रामदास कदम यांनी आपले राजकीय करियर संपवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही केला आहे. मी आयुष्यभर शिवसेनेचा कार्यकर्ता राहिलो आहे. मी शिवसेनाचा मावळा आहे. पण फक्त अनिल परबांच्या रिसॉर्टच्या विरोधात बोललो म्हणून माझ्या विरोधात घोषणा दिल्या गेला. माझे राजकीय करियर संपवण्यासाठी शिवसेनेतीलच काही नेत्यांचा डाव असल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com