Ram Shinde : 'लोक म्हणतात... मी नशीबवान..! पडल्यानंतरही आमदार अन् सभापती झालो; शिंदे यांचे वक्तव्य

Ram Shinde
Ram ShindeSarkarnama
Published on
Updated on

Pune News : एखाद्याचा सलग दोनदा विजय त्यात राज्याचे गृहराज्य मंत्री पद मिळालेल्या व्यक्तीचा सलग दोनदा पराभव झाला तो जिव्हारी लागणारा असतो. त्यातपण अपयश पचवून पून्हा कामाला लागत तयारी केल्यानंतरी पदरी अपयश आल्यास असा माणूस पार खचून जातो. पण खचणारे राम शिंदे कसले. 2014 आणि 2019 मध्ये राहित पवार यांच्यांकडून पराभव झालेल्या शिंदेंना भाजपने 2024 मध्ये एकनिष्ठ राहण्याचे मोठे बक्षीसचं दिले. यामुळे मतदारसंघातील जनतेसह राज्यातील नेते त्यांना आता नशीबवान म्हणत आहेत.

राम शिंदे यांना भाजपने विधान परिषदेवर पाठवले. त्यांना आमदार केले. फक्त आमदाराचं केलं नाही. तर त्यांची विधान परिषदेचे सभापती बिनविरोध निवड करण्यात आली. यानंतर त्यांचा इंदापूरकरांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी सत्कारास उत्तर देताना, आपण जनता जनार्दनाचे आशीर्वाद व भाजपच्या पाठबळामुळे आज इथंपर्यंत येऊन पोहचलो आहोत. पराभूत होऊनही आज आमदार अन् सभापती झालो. हे माझे भाग्यच असे ते म्हणाले. यावेळी क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे व इतर मान्यवर उपस्थित होते.

विधान परिषदेचे सभापती या नात्याने माझ्या राजकीय जीवनाच्या सर्वोच्च पदावर गेलो आहे. आपण ज्या पदावर जातो त्या पदासाठी आपण कशा पद्धतीचे योगदान देतो हे महत्त्वाचे आहे. आणि या पदासाठी मी माझे योगदान नक्कीच देईन, असेही शिंदे म्हणाले.

Ram Shinde
Ram Shinde : विरोधकांनी नुरा कुस्ती खेळली, मला कळलंच नाही, राम शिंदेनी सांगितलं पराभवाचे कारण

शिंदे म्हणाले की, विधान परिषद हे वरिष्ठ व ज्येष्ठांचे सभागृह आहे. माझ्यासारख्या एका तरुण कार्यकर्त्याला पहिल्यांदाच सभापती पद मिळाले आहे. कार्यकाळ संपण्यास एक दिवस कमी असताना हे पद माझ्याकडे आले. पण मी तर भाजपचा नसतो तर हे पद माझ्याकडे आले नसते. मी सभापती झालो नसतो.

सध्या सभागृहात आमचे 240 आमदार आहेत. मंत्रिमंडळात 42 मंत्री आहेत. तर उरलेल्या 198 आमदारांपैकी मी सभापती झालो. त्यामुळेच कदाचित लोक, मी नशीबवान असल्याचे म्हणतात. मलाही तसेच वाटतं, मी नशीबवान आहेच. दोनदा पडलो तरी आमदार झालो. दुसऱ्यांदा सभापती झालो.

Ram Shinde
Ram Shinde : प्राध्यापक ते विधान परिषदेचे सभापती; वाचा राम शिंदेंचा राजकीय प्रवास

यावेळी, जी माणसं खडतर प्रवास करतात त्यांचे यश मोठे असते. प्रा. शिंदेंना कष्टाची सवय आहे. ते भाजपचे मोठे नेते आहेत. यामुळेच त्यांच्या कष्टाला फळ देत भाजपने त्यांना खूप मोठे पद दिलय. या पदाचा उपयोग ते निश्चितपणे जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी करतील, असे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com