केडगाव : दौंड तालुक्यातील केडगावमधील स्वप्निल लोणकर (Swapnil Lonkar) याच्या आत्महत्येची घटना ताजी असतानात दौंड तालुक्यातुनच आणखी एक आत्महत्येची घटना समोर येत आहे. तालुक्यातील देऊळगावगाडा येथील मल्हारी नामदेव बारवकर (वय २५) (Malhari Barwarkar) या युवकाने आज गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी ४ च्या दरम्यान ही घटना घडली. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार मल्हारी स्पर्धा परीक्षेचा (MPSC Study) अभ्यास करत होता. बारवकर याने नैराश्यातून ही आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे.
याबाबत अधिकची माहिती अशी की, आज दुपारी बारवकर यांच्या विठ्ठलवाडीतील घरी आजी व मल्हारी दोघेच होते. यावेळी आजीची नजर चुकवून मल्हारीने घरात साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना त्याच्या आजीनेच पहिल्यांदा पाहिली. त्यांनी तातडीने शेजाऱ्यांना बोलावून घेतले. मात्र त्यापुर्वीच मल्हारीचा मृत्यू झाल्याले आढळून आले.
मल्हारी त्याच्या आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होता. तेथील सरपंच विशाल बारवकर यांच्या माहितीनुसार शाळेत तो हुशार होता. त्याचे वडिल नामदेव बारवकर हे सार्वजनिक बांधकाम विभागात मैलकोली म्हणून काम करतात. मल्हारी याने मृत्यूपुर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. मी तुम्हाला दाखवलेली स्वप्न पुर्ण करू शकत नाही. तुमचे पडलेले चेहरे पाहू शकत नाही. आत्महत्येस कोणाला जबाबदार धरू नये. भविष्यात काही सकारात्मक चित्र दिसत नाही. चांगले जगण्याच्या आशा संपलेल्या आहेत. सॅारी. असे चिठ्ठीत नमूद केले आहे. रात्री ९ वाजता मल्हारी याच्यावर विठ्ठलवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
मल्हारी हा गेली तीन वर्ष पुण्यातील स्पर्धा परीक्षा केंद्रात अभ्यास करत होता. यासाठी मोठा खर्चही त्याच्या आईवडीलांनी केला होता. मात्र कोविडमुळे सतत परीक्षा पुढे ढकलत गेल्या. त्यामुळे तो नैराश्यात गेल्याने त्याने आत्महत्येचे पाऊल उचलले, असे माजी सरपंच डी.डी. बारवकर यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.