अवघड जागेचे दुखणं : मिश्रांच्या हकालपट्टीसाठी अधिवेशन गुंडाळण्याचा मार्गावर

Lakhimpur Khiri And Ajay Mishra : ऐन अधिवेशन काळात लखीमपूर खीरीवरील वादग्रस्त अहवाल
Lakhimpur Khiri And Ajay Mishra

Lakhimpur Khiri And Ajay Mishra

Sarkarnama

नवी दिल्ली : केंद्र सरकारने संसदेचे हिवाळी अधिवेशन (Winter Session) गुंडाळण्याच्या हलचाली सुरु केल्याची माहिती अत्यंत खात्रीलायक सुत्रांनी 'सरकारनामा'ला दिली आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे विरोधकांचा निलंबनामुळे मागील ३ आठड्यापासून सुरु असलेला गोंधळ, आणि ऐन अधिवेशन काळात लखीमपूर खीरीवरील आलेला वादग्रस्त अहवाल आणि त्यातुन वादात सापडलेले केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी (Ajay Mishra). त्यामुळे काही महत्वाची विधेयक राज्यसभेत गोंधळात किंवा विरोधकांनी सभात्याग केल्यावर मंजूर करवून घेवून सोमवारी किंवा मंगळवारी अधिवेशनाचे सूप वाजण्याच्या हालचाली आहेत.

गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांना हाकलण्यासाठीच सरकारने अधिवेशन समाप्तीचा मुहूर्त काढल्याचे मुख्य कारण सध्या समोर येत आहे. अधिवेशन संपले रे संपले की टेनी यांनी स्वतः पद सोडण्याचे निर्देश त्यांना देण्यात आल्याचे संकेत भाजपच्या वरच्या वर्तुळातून मिळाले आहेत. काहीही करून टेनींचा विषय संसदेत आणखी तापू द्यायचा नाही असा निश्चय सरकारने केला आहे. सरकारला आवश्यक ती १-२ विधेयके मंजूर केल्यावर राज्यसभाचे सभापती वेंकय्या नायडू यांनी १२ खासदारांचे निलंबन मागे घेण्याची घोषणा करायची आणि तत्काळ अधिवेशनही संस्थगित करायचे अशा निश्चित हालचाली सुरु आहेत.

<div class="paragraphs"><p>Lakhimpur Khiri And Ajay Mishra</p></div>
विधीमंडळ अधिवेशनाची लगबग सुरू होताच... अधिकाऱ्यांना आलायं टेन्शन!

टेनी महाराज यांना आताच हाकलले तर ब्राह्मण व्होटबॅंकेच्या नाराजीची भिती हीच त्यांची पात्रता आहे का? असा सवाल राजकीय विश्लेषक सईद अंसारी यांनी केला. पत्रकारांच्या अंगावर शिव्या देत धावून जाणारे मिश्रा यांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली. पण त्यातील 'सत्य- न्यायनिष्ठा' वगैरे शब्द तरी त्यांना समजत तरी असतील का? असेही अन्सारी म्हणाले. मंत्रिपदाच्या खुर्चीला घट्ट चिकटून असलेले मिश्रा यांच्यासमोर लखीमपुरात 'त्या वेळी' एकटादुकटा पत्रकार असता तर त्याचा मोबाईल तरी वाचला असता का? अशी भिती अंसारी यांनी व्यक्त केली.

विरोधकांची मॉक पार्लमेंट :

राज्यसभेच्या निलंबित १२ सदस्यांसह विरोधी पक्षातील खासदारांनी आज महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ मॉक पार्लमेंट भरवली होती. या मॉक पार्लमेंटमध्ये जोरदार घोषणा होत्या. जोडीला एमएसपी कायदा, कोरोना या विषयावरील चर्चा होती. मंत्री टेनी यांच्याविरोधातील ठरावही याच मॉक पार्लमेंटमध्ये होता. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी सभागृहात मला बोलूही दिले जात नाही असा आरोप केला. सभापती येतात आणि २ सेकांदांत कामकाज तहकूब करून निघून जातात, याबद्दल खर्गे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. लखीमपूर खीरीचे शेतकरी हत्याकांड व यातील वादग्रस्त मंत्री मिश्रा यांचा राजीनामा हा निश्चित मोठा मुद्दा आहे असेही ते म्हणाले.

<div class="paragraphs"><p>Lakhimpur Khiri And Ajay Mishra</p></div>
अमित शहांची मोठी घोषणा : जिल्हा बॅंकांवर केंद्र सरकारचे नियंत्रण येणार!

तर आमचे लोकशाही हक्क संसदेत नाकारल्याने आपल्या याठिकाणी मॉक पार्लमेंट भरवण्याची वेळ आली असल्याचे तृणमूल कॉंग्रेसच्या नदीम उल हक व डोला सेन यांनी 'सरकारना'ला सांगितले. यातील हक यांचा निलंबित खासदारांमध्ये समावेश नाही तरी या खासदारांवरील अन्याय मांडण्यासाठी आपण आत न जाता राष्ट्रपितांच्या पुतळ्याजवळ आलो असेही त्यांनी सांगितले. दुसऱ्या बाजूला केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी ‘देशाच्या पक्षांचे गल्लीतील पक्षांत रूपांतर म्हणजे ही मॉक पार्लमेंट आहे, अशी खिल्ली उडवली. ते म्हणाले की हे संसदेत येणार नाहीत, आले तर संसदेची प्रतिष्ठा धुळीला मिळवणार व बाहेर बसून मॉक पार्लमेंट भरवणार, ही सारी लोकशाहीची थट्टा आहे.

राज्यसभेतील बड्या नेत्याच्या घरी विवाह समारंभ :

या अधिवेशन काळात राज्यसभेतील दक्षिणेतील एका बड्या नेत्याच्या निवासस्थानी विवाह समारंभ आहे. या विवाह सोहळ्याला सर्व खासदारांनी उपस्थित रहावे अशी इच्छा असलेल्या या नेत्याने सर्व खासदारांना लग्नाच्या निमंत्रण पत्रिका त्यांच्या त्यांच्या मातृभाषेत पाठविल्याची माहिती आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com