Eknath Shinde : निवडणुकांच्या तोंडावर शिंदे सरकारनं चालवलं 'मराठी कार्ड'

CM Eknath Shinde governments big order regarding Marathi language : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी भाषेविषयी मोठा निर्णय घेतला आहे.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : देशभरात हिंदी दिन साजरा होत असताना, राज्य सरकारने मराठी भाषा विषयावर मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी भाषा विषय सक्तीसंदर्भात मोठा निर्णय घेताना त्यासंदर्भात आदेश काढला आहे.

मराठी भाषा विषय खासगी तसंच सरकारी शाळांमध्ये सक्तीनं शिकवत, गुणपद्धतीत घ्यावा, असा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आणि हिंदी दिनी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी भाषा विषयावर मोठा निर्णय घेत मास्टर स्ट्रोक खेळला आहे.

मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळावा, यासाठी महाराष्ट्राचा संघर्ष सुरू आहे. साहित्य, कला, राजकीय, सर्वसामान्यांकडून सुरू असलेला संघर्ष दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यातील महायुती सरकारनं मराठी भाषाला राजभाषेचा दर्जा मिळावा, यासाठी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्राकडे अधिकचा पाठपुरावा सुरू केलाय. यातच आज हिंदी भाषा दिवस साजरा केला जात असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मराठी भाषाविषयी राज्यात मोठा निर्णय घेतला आहे.

Eknath Shinde
BJP And Congress : जेपी नड्डा मुंबईत, तर पटोले दिल्लीत; भाजप आणि काँग्रेसमध्ये 'जोर' बैठका

देशात हिंदी दिन साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्याबरोबर देशभरातील प्रमुख नेते हिंदी दिनाच्या शुभेच्छा देत आहेत. यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने मराठी भाषा राज्यातील शाळांना अनिवार्य करण्याचा निर्णय घेतल्याचा अध्यादेश समोर आला आहे. मराठी विषय खासगी तसंच सरकारी शाळेत सक्ती केली आहे. मराठी विषयासाठी श्रेणी नाही, तर थेट गुणांकन करा, असा आदेश देत राज्य सरकारने मराठी भाषेसाठी सक्तीचं पाऊल उचललं आहे.

याबाबतचा शासन निर्णय देखील जाहीर करण्यात आला आहे. या आदेशानुसार 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून सर्व माध्यमातील शाळांमध्ये मराठी विषयाची परीक्षा घ्यावी लागणार आहे. या परीक्षेत मराठी विषयाला श्रेणी देऊन मूल्यांकन न करता गुण देऊन मूल्यांकन केलं जाईल, असं आदेशात म्हटलं आहे.

Eknath Shinde
Video BJP Politics : लोकसभेतून धडा, विधानसभेसाठी भाजपचा प्लॅन ठरला, केंद्रीय मंत्री महाराष्ट्रात...

इतर माध्यमातील शाळांमध्ये मराठी भाषा विषय गांभीर्याने शिकवला जात नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर राज्य सरकारकडून ही नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. 2025-2026 या शैक्षणिक वर्षापासून नव्या पद्धतीची अंमलबजावणी होणार आहे, असे राज्य सरकारने सूचित केलं आहे. मराठीला राजभाषोचा दर्जा मिळावा, यासाठी राज्य सरकारचे केंद्राकडे प्रयत्न सुरू असतानाच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा विषय सक्तीचा करून मराठी कार्ड चालवल्याची चर्चा रंगलीय.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com