Shetkari Karjmafi : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ! कर्जमाफी योजनेची तिसरी यादी जाहीर, 17 लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ

Farmer Loan Waiver Scheme 2026 Third Beneficiary List Announced : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची तिसरी यादी शुक्रवारी जाहीर करण्यात आली.
Ahilyadevi Holkar Farm Loan Waiver Scheme
Ahilyadevi Holkar Farm Loan Waiver Scheme sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Farmer Loan Waiver Scheme News : ''पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना -२०२६'' अंतर्गत १६ लाख ९६ हजार पात्र शेतकऱ्यांची तिसरी यादी शुक्रवारी जाहीर करण्यात आली आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या याद्याही लवकरच प्रसिद्ध केल्या जाणार असल्याची माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली. या योजनेचा राज्यातील सुमारे ५६ लाख पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून, पात्र शेतकऱ्यांनी लाभ मिळवण्यासाठी ''ॲग्रीस्टॅक''वर नोंदणी करून आधार प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

सहकारमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, योजनेतील पात्र लाभार्थ्यी शेतकऱ्यांची यादी संबंधित बँकांनी महाआयटीने विकसित केलेल्या पोर्टलवर अपलोड केली असून त्याची प्राथमिक पडताळणी पूर्ण झाली. आधार प्रमाणीकरणाच्या पुढील प्रक्रियेसाठी पात्र शेतकऱ्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे सूचना पाठविल्या जात आहेत.

याशिवाय ग्रामपंचायत कार्यालये, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आणि संबंधित बँकांच्या शाखांमध्येही कर्जमाफीतील लाभार्थ्यांच्या याद्या नागरिकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. योजनेतील पारदर्शकता टिकवण्यासाठी प्रत्येक पात्र लाभार्थ्याला एक विशिष्ट ओळख क्रमांक (युनिक आयडी) देण्यात येणार आहे. शेतकरी आधार क्रमांकाच्या आधारे प्रमाणीकरण पूर्ण करू शकणार आहेत.

Ahilyadevi Holkar Farm Loan Waiver Scheme
Loan Waiver Loan Waiver : पुणे जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना कर्जमाफी? तालुकानिहाय आकडेवारी जाहीर; मुळशीत फक्त दोन हजार, तर इंदापूरमध्ये १८ हजार…

यासाठी राज्यातील सुमारे ३२ हजार ''आपले सरकार सेवा केंद्रां''मध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ॲग्रीस्टॅकवरील नोंदणी आणि आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, थेट लाभ हस्तांतर प्रणालीद्वारे कर्जमुक्तीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा केली जाणार आहे.

१३ हजार कोटी होणार जमा

शेतकरी कर्जमुक्ती योजनेत पात्र ठरलेल्या १७ लाख शेतकऱ्यांना सुमारे १३ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. ही रक्कम आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर आणि कर खात्यासंबंधात काही तक्रार नसेल तर शेतकऱ्यांच्या खात्यात विनाविलंब जमा केली जाणार आहे. उर्वरित थकबाकीदारांच्या याद्यांची पडताळणी सुरू असून, त्यांनाही टप्प्याटप्प्याने कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याचे सहकार मंत्री पाटील यांनी सांगितले.

Ahilyadevi Holkar Farm Loan Waiver Scheme
Maharashtra Farm Loan Waiver : कर्जमाफीच्या पहिल्या यादीत नाशिकसह उत्तर महाराष्ट्राला डच्चू ! एकाही शेतकऱ्याचं नाव नाही

महत्त्वाचे मुद्दे

कर्जमाफीच्या याद्या गावोगावी होणार प्रसिद्ध

शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक

बँकेने भरलेल्या माहितीची शेतकऱ्यांकडून होणार पडताळणी

माहिती बरोबर असेल तर कर्जमाफीची रक्कम होणार खात्यात जमा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com