Loan Waiver Loan Waiver : पुणे जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना कर्जमाफी? तालुकानिहाय आकडेवारी जाहीर; मुळशीत फक्त दोन हजार, तर इंदापूरमध्ये १८ हजार…

Loan Waiver Taluka-wise Beneficiary List : पुणे जिल्ह्यातील १ लाख ८ हजार ४१ थकीत कर्जदारांचा तपशील पोर्टलवर अपलोड करण्यात आला आहे. त्यामध्ये तालुकानिहाय आकडेवारी जाहीर
Loan Waiver Farmers
Loan Waiver Farmerssarkarnama
Published on
Updated on

Loan Waiver News : पुणे जिल्ह्यातील १ लाख ८ हजार ४१ थकीत कर्जदारांचा तपशील पोर्टलवर अपलोड करण्यात आला आहे. त्यामध्ये तालुकानिहाय आकडेवारी जाहीरराज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्यादृष्टीने जाहीर केलेल्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना'-२०२६ च्या अंमलबजावणीअंतर्गत पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून जिल्ह्यातील १ लाख ८ हजार ४१ थकीत कर्जदारांचा तपशील पोर्टलवर अपलोड केला आहे. या विषयची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे.

शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्यादृष्टीने त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, आत्मविश्वास वाढवणे आणि शेती क्षेत्राला नवसंजीवनी देण्याचा उद्देशाने ही योजना जाहीर करण्यात आली आहे. सहकार विभागाच्या जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे ग्रामीण कार्यालयाच्यावतीने या योजनेची प्रभावी, पारदर्शक अंमलबजावणी आणि वेळेत लाभ देण्यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेला कर्जदारांचा तपशील पोटर्लवर माहिती अपलोड करण्याचे आवाहन केले असता बँकेच्यावतीने संपूर्ण कर्जदार खातेदाराची माहिती पोटर्लवर अपलोड केली आहे.

तालुकानिहाय कर्जदार खातेदार संख्या

बँकेकडून कर्ज तपशील अपलोड केलेल्या खातेदारांची संख्या आंबेगाव तालुक्यात ३ हजार ३९०, बारामती १३ हजार ७२८, भोर ७ हजार २४२, दौंड १९ हजार ५६२, हवेली ४ हजार १६८, इंदापूर १८ हजार ८१८, जुन्नर ७ हजार ७७८, खेड ७ हजार ८५३, मावळ ५ हजार १७२, मुळशी २ हजार ३८७, पुरंदर ७ हजार ९०३, शिरुर ८ हजार ४५२ आणि वेल्हा १ हजार ८८८ थकीत कर्ज खातेदार याप्रमाणे आहे.

Loan Waiver Farmers
Modi Government : तब्बल 36 खासदार वळविले, पण एका झटक्यात मोदी सरकारच्या मनसुब्यांवर फिरलं पाणी!

वारस नोंद नसल्याचा फटका...

जिल्ह्यातील ११३ शेतकरी पात्र असूनही मयत असल्याने व अशा शेतकऱ्यांची वारस नोंद न झाल्याने अशा खात्याची माहिती अपलोड करता आलेली नाही. तसेच २९ सभासद लाभ घेण्यास पात्र असूनही त्यांचे आधार क्रमांक उपलब्ध नसल्याने यांची माहिती पोर्टलवर अपलोड करता आलेली नाही. त्यामुळे मयत सभासदांच्या वारसांनी वारस नोंद तात्काळ करुन घ्यावी व आधार क्रमांक नसलेल्या सभासदांनी आधार क्रमांक उपलब्ध करून घ्यावा, जेणे करून त्यांची महिती पोर्टलवर अपलोड करता येईल, असेही आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

Loan Waiver Farmers
Farmer Loan Waiver Scheme 2026 : शेतकऱ्यांना मोठा दिलासा! काय आहे 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026'? कोणाला आणि कसा मिळणार लाभ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com