
Nashik News : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भारत-पाक दरम्यान सध्या युद्धजन्य परिस्थिती पहावयास मिळत आहे. त्यामुळेचा आता हवाई वाहतुकीवर निर्बंध आले आहेत. ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतर उमटलेले पडसाद यामुळे देशातील वातावरण गंभीर बनले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून हवाई वाहतुकीवर निर्बंध लादण्यात आले आहेत. त्याचा फटका हवाई वाहतुकीला बसला आहे.
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि अन्य विमानतळांवरून हवाई वाहतुकीवर नियंत्रण आले आहे. त्यामुळे अनेक हेलिकॉप्टर्स उड्डाणांना मनाई करण्यात आली आहे. पूर्वसूचने शिवाय ही स्थगिती उठविण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या स्थितीचा फटका राज्यातील अनेक मंत्र्यांना आणि वरिष्ठ स्तरावरील नेत्यांना बसला आहे. हेलिकॉप्टर्स उड्डाणांना परवानगी न मिळाल्याने अनेक मंत्र्यांना आपले दौरे रद्द करावे लागले आहे. पशु व दुग्ध व्यवसाय मंत्री पंकजा मुंडे (Pankaja munde) यांच्या नाशिक दौऱ्याला त्याचा फटका बसला आहे.
मंत्री मुंडे आज नाशिक दौऱ्यावर होत्या. यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम होणार होते. सकाळी त्यांच्या हेलिकॉप्टरला उड्डाण करण्यास परवानगी नाकारण्यात आली. भारत-पाक अस्थिर परिस्थितीमुळे हे निर्बंध लादण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे मंत्री मुंडे यांना आपल्या दौरा रद्द करावा लागला आहे.
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांनीही सध्याची राष्ट्रीय स्तरावरील अस्थिर परिस्थिती पाहता कोणतेही वक्तव्य करण्याचे टाळले. याबाबत सर्वच मंत्र्यांना काही सूचना करण्यात आल्या आहेत. त्या सूचनांचे पालन करणे आवश्यक असल्याने आपण कोणतेही विधान करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पाकिस्तानने भारताच्या काही विमानतळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. त्या पार्श्वभूमीवर देशभर कोणतेही ड्रोन उडविण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. अनेक विमानतळांवरील विमान वाहतूक स्थगित करण्यात आली आहे. नाशिकच्या विमान सेवेलाही त्याचा फटका बसला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.