Shiv Sena : मित्र असलेल्या उद्धव ठाकरे गटाला ‘वंचित’चा जोर का झटका, पण अगदी धीरे से...

Vanchit Bahujan Aghadi : बड्या नेत्याची प्रकाश आंबेडकर यांना साथ
Vanchit Bahujan Aghadi
Vanchit Bahujan AghadiSarkarnama
Published on
Updated on

Shiv Sena : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते तथा माजी मंत्री बबनराव घोलप यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी (ता.16) आणखी एक मोठा धक्का ठाकरे गटाला बसला आहे. शिवसेनेसोबत युती असलेल्या ‘वंचित’ने हा मोठा धक्का दिला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हिंगोली लोकसभा संघटक तथा ओबीसी जनमोर्चाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष डॉ. बी. डी. चव्हाण यांनीही पक्षाला जय महाराष्ट्र करीत अकोल्यात वंचित बहुजन आघाडीत प्रवेश घेतला आहे.

अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत त्यांनी हा प्रवेश घेतला. दोन दिवसांपूर्वीच चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे म्हटले होते. लोकसभा निवडणूक अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली असतानाच पक्षातील नाराजीनाट्य उफाळून येताना पाहायला मिळत आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर अनेक जण पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश घेत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. आयाराम- गयाराम यांची संख्या वाढताना दिसत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Vanchit Bahujan Aghadi
Vanchit Bahujan Aghadi : चेन्नीथला-ठाकरे भेट, ‘वंचित’ म्हणते ‘फिर क्या बचा’

माजी मंत्री शिवसेना नेते बबनराव घोलप यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता. त्यानंतर आता पुन्हा ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. हिंगोली जिल्ह्यात ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. पक्षाचे हिंगोली लोकसभा संघटक तथा ओबीसी जनमोर्चाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष डॉ. बी. डी. चव्हाण यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत ‘वंचित’मध्ये प्रवेश घेतला आहे. चव्हाण यांच्या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेला हिंगोलीत मोठे खिंडार पडले आहे. दोन दिवसांपूर्वी चव्हाण हे हिंगोली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास ठाम होते. शिवसेनेने उमेदवारी देवो अथवा न देवो आपण निवडणूक लढविणार असल्याचे सांगत एकप्रकारे डॉ. चव्हाण यांनी ठाकरे गटालाच आवाहन दिले होते.

उमेदवारी न दिल्यास स्वतंत्र निवडणूक लढण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला होता. चव्हाण यांनी सोशल मीडियातूनही हिंगोली लोकसभा लढवणार म्हणजे लढवणारच, असे सांगून शिवसेनेला सोडण्याचा एकप्रकारे इशारा दिला होता. चव्हाण यांच्या पक्ष प्रवेशामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटात हिंगोलीत मोठी फूट पडली असल्याची चर्चा आहे. पूर्वी हिंगोली मतदारसंघ हा काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ होता. त्यानंतर शिवसेनेचे हेमंत पाटील हे निवडून आलेत. त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे या मतदारसंघासाठी महाविकास आघाडीत काँग्रेस इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे आपल्याला तिकीट मिळणार नसल्याचे ठरवत चव्हाण यांनी ठाकरे गट सोडला. मात्र, ‘वंचित’कडून तिकीट मिळावे अशी आशा त्यांना आहे. दुसरीकडे ‘वंचित’चा महाविकास आघाडीत समावेश झाला आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर हिंगोली लोकसभा मतदारसंघावर दावा ठोकू शकतात.

Vanchit Bahujan Aghadi
Prakash Ambedkar : जरांगे पाटलांनी जालन्यातून लोकसभा लढवावी; प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान

‘वंचित’ महाविकास आघाडीत न लढल्यास स्वतंत्र निवडणूक लढल्यास चव्हाण यांना उमेदवारी मिळू शकते. त्यामुळेच चव्हाण यांनी वंचितमध्ये प्रवेश घेतला असल्याची चर्चा आहे. चव्हाण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हिंगोली लोकसभा संघटक होते. ओबीसी जनमोर्चाचे मराठवाड्याचे डॉ. बी. डी. चव्हाण हे विभागीय अध्यक्ष आहेत. मागील 15 वर्षांपेक्षा अधिक काळापासून डॉ. बी. डी. चव्हाण हे शिवसेनेत काम करीत होते. अनेक वर्षांपासून ते लोकसभेसाठी उमेदवारी मिळावी, यासाठी पक्षाकडे सातत्याने मागणी करीत होते. मात्र, त्यांना पक्षाने न्याय दिला नसल्याचा आरोप त्यांनी केला होता. शिवसेनेतील फुटीनंतरही डॉ. चव्हाण हे ठाकरे गटाशी एकनिष्ठ राहिले होते. हिंगोली लोकसभा मतदारसंघात ओबीसी मतदारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे काँग्रेसकडून ओबीसी चेहरा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघात बंजारा समाजाची लोकसंख्या लक्षणीय आहे. त्यामुळे डॉ. चव्हाण यांचा ‘वंचित’मधील पक्ष प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. मराठा, ओबीसी संघर्षानंतर ओबीसी जनमोर्चाच्या माध्यमातून डॉ. चव्हाण यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे. डॉ. बी. डी. चव्हाण यांच्या ‘वंचित’च्या प्रवेशाने शिवसेनेची मात्र डोकेदुखी वाढणार आहे.

Edited By : Prasannaa Jakate

R

Vanchit Bahujan Aghadi
अशोक चव्हाणांचा राजीनामा, प्रकाश आंबेडकरांना भलतीच शंका | Ashok Chavan | Prakash Ambedkar |

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com