Maharashtra Budget 2025 : बजेटच्या मांडणीतील 'चारोळी'ला विरोधकांची दाद; अजितदादा म्हणाले, 'सुभान अल्लाह म्हणायचं नाही'

Maharashtra Deputy CM Ajit Pawar Budget 2025 poetic shayari appreciation opposition : डीसीएम अजित पवार यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2025 सादर करताना चारोळी, कविता आणि शेरों शायरीला विरोधकांनी दाद दिली.
Deputy CM Ajit Pawar
Deputy CM Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Economy 2025 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प केला आहे. त्यांच्या संकल्पपूर्तीला बळ देणारा वर्ष 2025-26चा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केला.

‘महाराष्ट्र आता थांबणार नाही.., विकास आता लांबणार नाही...’ असे सांगताना अजितदादांनी 'चोराळी', 'कविता' अन् 'शेरों शायरी'चा आधार घेतला. मराठी कविताला विरोधकांनी 'सुभान अल्लाह', 'इरशाद', असे म्हणत दाद दिली. यावर अजितदादांनी 'सुभान अल्लाह' म्हणायचं नाही, ते 'शेरों शायरी'ला म्हणायचं', असा टोला हसत-हसत विरोधकांना मारली.

अजितदादांनी (Ajit Pawar) अर्थसंकल्प मांडताना शेती, शेतीपूरक क्षेत्रं, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, पर्यटन, पायाभूत सुविधा, सामाजिक विकास, अशा अनेक क्षेत्रांसाठी भरीव तरतूद असलेला, ‘विकसित भारत-विकसित महाराष्ट्रा’चे स्वप्न प्रत्यक्षात आणणारा हा अर्थसंकल्प आहे, असे म्हटले. देशांतर्गत, विदेशी गुंतवणूक, रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी वाढतील. विधानसभा निवडणुकीत राज्यातील मतदारांनी व्यक्त केलेला विश्वास सार्थ ठरवण्यात अर्थसंकल्प यशस्वी होईल, असा विश्वासही अजितदादांनी अकरावा अर्थंसंकल्प विधानसभेत सादर करताना व्यक्त केला.

Deputy CM Ajit Pawar
Maharashtra Politics : विधानसभेत धोबीपछाड दिल्यानंतर एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरे पहिल्यांदाच समोरासमोर; पुढे काय घडलं..? (VIDEO)

जाण, भान, शान...

अजितदादांनी बजेटमध्ये (Budget) 'का सत्ता आम्हास मिळाली, त्याची जाण आहे, करायचे काय याचे भान आहे. साथ द्या आम्हास नेवू राज्य पुढती, उंची न्यावयाची शान आहे', अशी 'चोराळी' सादर केली. विरोधकांनी त्याला दाद दिली. सुभान अल्लाह, इरशाद, असे म्हणत दाद दिली. त्यावर अजितदादा म्हणाले, 'सुभान अल्लाह म्हणायचे नाही, ते शेरों शायरीला म्हणायचे', असा हसत-हसत विरोधकांना टोला लगावला.

Deputy CM Ajit Pawar
Maharashtra Sugar Industry Loan : कोल्हेंनी लोकसभेचा 'कडू' घास महायुतीला विधानसभेत 'गोड' करून दिला; साखरपेरणीसाठी मिळाले 188 कोटी!

राजकोषीय तूट 3 टक्क्यांपेक्षा कमी

राजकोषीय उत्तरदायित्व व वित्तीय व्यवस्थापन कायद्यानुसार राजकोषीय तूट स्थूल राज्य उत्पन्नाच्या 3 टक्क्यांपेक्षा कमी ठेवण्यातही शासन यशस्वी ठरले आहे. तसेच राज्याची महसुली तूट ही सातत्याने स्थूल राज्य उत्पन्नाच्या 1 टक्क्यापेक्षा कमी राहिली आहे. सन 2025-26 ची राजकोषीय तूट 1 लाख 36 हजार 235 कोटी रुपये आहे, असे अजितदादांनी सांगितले.

मुंबई विकासाचे केंद्र

आर्थिक सुधारणांच्या माध्यमातून, भांडवली खर्चातील वाढीद्वारे विकासचक्रास चालना देऊन राज्याच्या विकास दरात वाढ करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याचे प्रयत्न आहेत. मुंबई महानगर प्रदेशाची अर्थव्यवस्था 140 बिलीयन डॉलरवरून सन 2030 पर्यंत 300 बिलीयन डॉलर, तर सन 2047 पर्यंत 1.5 ट्रिलीयन डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. मुंबई महानगर प्रदेशात हाती घेण्यात आलेल्या विविध पायाभूत सुविधांची कामे जसे की वाढवण बंदर, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, बुलेट ट्रेन, मल्टीमोडल कॉरीडॉर, भुयारी मार्ग, मेट्रो प्रकल्प यामुळे हे क्षेत्र विकासाचे केंद्र ठरणार असल्याचा विश्वास अजितदादांनी व्यक्त केला.

50 लाख रोजगार निर्मिती अपेक्षा

''विकसित भारत- विकसित महाराष्ट्र' ही संकल्पना साध्य करण्याकरीता “मेक इन महाराष्ट्र”व्दारे गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्राचे नवीन औद्योगीक धोरण आखण्यात येणार आहे. पुढील पाच वर्षाच्या कालावधीत 40 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि 50 लाख रोजगार निर्मिती अपेक्षीत आहे', असेही अजितदादांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com