Ajit Pawar Controversial Statement : अजित पवारांच्या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री नाराज; म्हणाले, 'दान किंवा भीक नाही...'

Ajit Pawar Ramdas Athawale : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळात एकाच घरातील पाच जण केवळ शिष्यवृत्तीसाठी पीएचडी करत असल्याचे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर केंद्रीय मंत्र्याने नाराजी व्यक्त केली आहे.
Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Ramdas Athawale News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिवेशन काळात सभागृहात बोलताना शिष्यवृत्तीसाठी एकाच घरातले पाच जण पीएचडी करत आहेत, असे म्हटले होते. पीएचडी करण्यासाठी 41 हजार रुपये दरमहा मिळतात त्यासाठी एकाच कुटंबातील अनेक जण पीएचडी करत असल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

ते म्हणाले, अजित पवार यांचे हे वक्तव्य आश्चर्यकारक आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात स्पष्टपणे लिहून ठेवले आहे की शिक्षण हा प्रत्येक माणसाचा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे शिष्यवृत्ती ही कोणाची कृपा, दान किंवा भीक नाही; ती वंचित, कष्टकरी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा घटनात्मक अधिकार आहे.

'जर एकाच कुटुंबातील पाच विद्यार्थी पीएचडीपर्यंत पोहोचत असतील, तर त्यावर शंका घेण्याऐवजी समाजाने आणि शासनाने अभिमान व्यक्त केला पाहिजे. ही परिस्थिती म्हणजे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रत्यक्षात उतरलेला विजय आहे. आत्मसन्मान, समता आणि संविधानाने दिलेला हक्क जपण्यासाठी आहे.', असा टोलाही त्यांनी पवारांना लगावला.

Ajit Pawar
‘तुम्हाला मुलगी असेल तर मला न्याय द्या’ वडिलांचा टाहो, Anant Garje, Pankaja Munde, Gouri, Beed News

'कोणतेही शिक्षण कमी–जास्त नसते. प्रत्येक विषय, प्रत्येक अभ्यासक्रम आणि प्रत्येक ज्ञानशाखा समाजासाठी तितकीच महत्त्वाची असते. कोणता अभ्यास ‘उपयुक्त’ आणि कोणता ‘अनावश्यक’ हे ठरवण्याचा अधिकार कोणालाही नाही. आज वंचित समाजातील विद्यार्थी पीएचडी, संशोधन आणि परदेशी शिक्षणापर्यंत पोहोचत आहेत हेच खरे सामाजिक परिवर्तनाचे जिवंत उदाहरण आहे.', असे देखील ते म्हणाले.

...तर कारवाई करा

गैरप्रकार असतील तर कारवाई करा पण विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर हात टाकू नका! विद्यार्थ्यांशी चर्चा न करता घेतलेला कोणताही निर्णय आम्ही मान्य करणार नाही, असे देखील आठवले यांनी आपल्या सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. अजित पवार हे माझे मित्र आहेत आणि ते फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांशी निष्ठावान नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांनी केलेले हे वक्तव्य आश्चर्यकारक आहे, असे देखील त्यांनी सांगितले.

Ajit Pawar
Nashik NMC Elections : नाशिकमध्ये भाजपकडून इच्छुकांच्या मुलाखती सुरु, पहिल्याच दिवशी घराणेशाहीचे दर्शन

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com