Nashik NMC Elections : नाशिकमध्ये भाजपकडून इच्छुकांच्या मुलाखती सुरु, पहिल्याच दिवशी घराणेशाहीचे दर्शन

BJP dynastic politics : भाजपने नाशिकमध्ये शंभर प्लसचा नारा दिला आहे. त्यादृष्टी सर्व ३१ प्रभागांमधील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहे. पहिल्या दिवशी १५० पेक्षा अधिक इच्छुकांनी मुलाखती दिल्या.
Nashik NMC Elections
Nashik NMC ElectionsSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : महापालिका निवडणूकांची घोषणा लवकरच होण्याची शक्यता असून त्यादृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. नाशिकमध्ये भाजपने 'शंभर प्लस'चा नारा दिलेला असून त्यादृष्टीने इच्छुकांच्या मुलाखती देखील सुरु झाल्या आहेत.

भाजपकडून नाशिक महापालिका निवडणुकरीता उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, रविवार (दि. १४) पक्षाच्या वसंत स्मृती कार्यालयात इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. भाजपकडे सर्वाधिक एक हजाराहुन अधिक अर्ज प्राप्त झाले होते. त्यामुळे मुलाखतींकडे लक्ष लागले होते. पहिल्या दिवशी नाशिक मध्य मतदारसंघातील प्रभाग क्रंमाक ७, १३, १४ मधील १५० पेक्षा अधिक इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या.

मात्र मुलाखतीच्या पहिल्याच दिवशी भाजपमधील घराणेशाहीचे दर्शन झाले. आमदार देवयानी फरांदे यांचे पुत्र अजिंक्य, माजी शहराध्यक्ष गिरीश पालवे यांच्या पत्नी वंदना, ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी यांची कन्या नूपुर, सतीश शुक्ल यांचे पुत्र प्रतीक, शिवाजी गांगुर्डे यांचे पुत्र रवींद्र यांनी मुलाखती दिल्या. त्यामुळे नगरपरिषदांच्या निवडणुकीप्रमाणेच महापालिका निवडणुकीतही भाजपमधील घराणेशाहीचे दर्शन होत आहे.

Nashik NMC Elections
Sadhugram construction stay demand : तपोवनातील वृक्षतोड, मनसेनं उभारला कायदेशीर लढा; थेट साधुग्रामला स्थगितीची मागणी

१४ ते १९ डिसेंबर दरम्यान शहरातील सर्व ३१ प्रभागांमधील १२२ जांगासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती भाजपकडून घेतल्या जाणार आहे. शहरातील एका विधानसभा मतदारसंघासाठी दोन दिवस या प्रमाणे नियोजन करण्यात आलेले आहे.

शहराध्यक्ष सुनील केदार यांच्यासह आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, माजी आमदार बाळासाहेब सानप, माजी महापौर सतीश कुलकर्णी, ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, विजय साने, प्रा. सुहास फरांदे आदींनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. त्यांनी इच्छुकांशी 'वन टू वन' संवाद साधला. भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी का हवी?, तुमचे सामाजिक कार्य काय? प्रभागाची माहिती असे प्रश्न इच्छुकांना विचारण्यात आले.

Nashik NMC Elections
Nashik Simhastha land expansion protest : साधुग्रामला इंच वाढीव जागा देणार नाही; सरकारचं 1200 एकर जमीन आरक्षित करण्याचं धोरण, आता शेतकरी कृती समिती आक्रमक

दरम्यान, महापालिका निवडणुकीत भाजप महायुतीमधील आपल्या घटक पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढणार की स्वतंत्र याबाबत अद्याप काहीही निर्णय झालेला नाही. असे असताना भाजपकडून शहरातील सर्वच ३१ प्रभागांमधील इच्छुकांचा मुलाखती घेतल्या जात असल्याने भाजप स्वबळावरच लढेल, अशा चर्चांना जोर धरला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com