Ajit Pawar News : नागरिकांना काम करणारे सरकार हवे; अजित पवारांची विरोधकांवर टीका

NCP Political News : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता 17 तारखेला मिळणार आहे. कालच सहा हजार कोटींच्या फाइलवर सही करून आलोय. त्यामुळे लवकरच पहिला हफ्ता खात्यावर जमा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Dindori News : राज्य सरकारच्या विविध योजेनच्या माध्यमातून सर्वांना फायदा होत आहे. शेतकरी वर्ग, महिला, विद्यार्थीं व युवक वर्गाला या योजनेतून मदत होणार आहे. महायुतीचे सरकार हे काम करणारे सरकार आहे. विरोधकांकडून केल्या जात असलेल्या खोट्या प्रचाराला बळी पडू नका, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

त्यासोबतच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता 17 तारखेला मिळणार आहे. कालच सहा हजार कोटींच्या फाइलवर सही करून आलोय. त्यामुळे लवकरच पहिला हफ्ता खात्यावर जमा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दिंडोरीतून राष्ट्रवादी काँग्रेस (Ncp) अजित पवार गटाच्या जनसन्मान यात्रेला गुरुवारी सुरुवात करण्यात आली. या यात्रेची सुरुवात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित करण्यात आली. यावेळी त्यांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

माझी लाडकी बहीण ही योजना आम्ही तुमच्यासाठी दिली आहे. त्यामुळे माझी विनंती आहे, ते पैसे तुमच्या स्वत:साठी खर्च करा, वर्षभरासाठी 46000 कोटी रुपये आपण खर्च करत आहोत. विरोधकांकडून टीका केली जातेय की हा चुनावी जुमला आहे, पण माय माऊलींनो मी तुम्हाला सांगतो, हे तात्पुरते नाही. तुम्ही महायुती सरकारला पुन्हा आशीर्वाद द्या. पुढील 5 वर्षे ही योजना चालेल हा अजित दादाचा वादा असल्याचा शब्द अजित पवार (Ajit Pawar) यांनी जनसन्मान यात्रेच्या पहिल्याच दिवशी दिला.

Ajit Pawar
BJP Leader Raosaheb Danve : मातोश्रीवर निर्णय घेणारे ठाकरे आता राहुल गांधींच्या दारात..

राज्य सरकारची माझी लाडकी बहीण ही योजना गावागावात, पाड्यावर, वाडीवस्तीवर सगळीकडे माहिती झालीय की, अशी योजना आली आहे. गावाकडं आई स्वत:च्या पोटाला चिमटा देऊन आपल्या लेकरांसाठी काहीतरी करते.

पण, तिलाही वाटत असेल कुठतरी जत्रेत जावं, काहीतरी घ्यावं. महिलांच्या या आशा, अपेक्षांसाठी आम्ही यंदाच्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजना आणली. माझ्या माय माऊलीच्या पाठीशी मी आहे. कालच, मी 6000 कोटी रुपयांच्या फाईलवर सही करुन आज तुम्हाला भेटायला आलोय, असे अजित पवार यावेळी बोलताना म्हणाले.

महिलांकडून उपमुख्यमंत्री पवारांचे स्वागत

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी राज्यभरातून सव्वा कोटी महिला भगिनींनी अर्ज केले आहेत. राज्य सरकारकडून रक्षाबंधन सणाच्या अगोदरच महिलांच्या खात्यात दोन महिन्यांचे 3000 रुपये देण्याचा प्रयत्न आहे.

विशेष म्हणजे 17 ऑगस्ट रोजी 1 कोटीपेक्षा जास्त महिलांच्या बँक खात्यात जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांचा हफ्ता म्हणून 3000 रुपये मिळणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे यावेळी महिलांनी दिंडोरीत स्वागत केले.

Ajit Pawar
Rajya Sabha Session : मी सक्षम नाही... म्हणत धनखड यांनी सभापतींची खुर्ची सोडली! राज्यसभेत मोठा गदारोळ...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com