Rajya Sabha Session : मी सक्षम नाही... म्हणत धनखड यांनी सभापतींची खुर्ची सोडली! राज्यसभेत मोठा गदारोळ...

Jagdeep Dhankhar Congress Vinesh Phogat : राज्यसभेत काँग्रेसच्या खासदारांनी विनेश फोगाटचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावरून बराच गदारोळ झाला.
Jagdeep Dhankhad in Rajya Sabha
Jagdeep Dhankhad in Rajya SabhaSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरलेल्या कुस्तीपटू विनेश फोगाटवरून गुरूवारी राज्यसभेत मोठा गदारोळ झाला. सभागृहा विनेश फोगाटचा मुद्दा उपस्थित करून विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रय़त्न केला. पण राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी परवानगी दिली नाही. त्यावरून धनखड आणि विरोधी बाकांवरील खासदारांमध्ये चांगली खडाजंगी झाली.

राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खर्गे यांनी यांनी राज्यसभेत विनेश फोगाटवर बोलण्याचा प्रयत्न केला. पण सभापतींनी मान्यता दिली नाही. त्यानंतर तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनीही त्यावर बोलण्याचा प्रय़त्न केला असता धनखड यांनी त्यांनी रोखत सभागृहाबाहेर काढण्याचा इशारा दिला.

Jagdeep Dhankhad in Rajya Sabha
Vinesh Phogat : …तर विनेश फोगाट राज्यसभेत! राजकारण तापलं, काँग्रेसने टाकली गुगली

विरोधकांवर चांगलेच भडकलेले सभापती म्हणाले, ‘संपूर्ण देशाला विनेशबाबत सहानुभूती आहे. पण यावर राजकारण करू नका. जे पदकविजेत्यांना मिळते, ते तिला दिले जाईल.’ पण विरोधक ऐकायला तयार नव्हते. त्यांनी थेट वॉकआऊट केले. विरोधकांच्या या भूमिकेवर धनखड नाराज झाली.

पवित्र सभागृहाला अराजकतेचे केंद्र बनवणे, अध्यक्षांच्या प्रतिमेला धक्का पोहचवणे, आव्हान देण्याचे वातावरण तयार करणे, हे वागणे सर्व मर्यादा ओलांडणारे असल्याचे धनखड म्हणाले. हे आव्हान मला नाही तर सभापतींचंया खुर्चीला दिले जात आहे. या खुर्चीवर बसलेला व्यक्ती या पदाच्या लायक नाही, असे या लोकांना वाटते, अशी तीर्व नाराजीही त्यांनी व्यक्त केली.

Jagdeep Dhankhad in Rajya Sabha
Vinesh Phogat : …तर विनेश फोगाट राज्यसभेत! राजकारण तापलं, काँग्रेसने टाकली गुगली

काय सोडली खुर्ची?

धनखड एवढ्यावरच थांबले नाही. विरोधकांना खडसावत त्यांनी स्वत:ही काही वेळासाठी खुर्ची सोडत एकप्रकारे विरोधकांच्या भूमिकेचा निषेध केला. ते म्हणाले, सभागृहाची प्रतिष्ठा कमी करू नका. काही खासदार चुकीचे बोलतात. मला सभागृहाचे समर्थन हवे तेवढे मिळत नाही. मी खूप प्रयत्न केले. आता माझ्याकडे एकच पर्याय आहे. मी शपथेपासून लांब जात नाही. सदस्य ज्याप्रकारे वागले आहे, त्याने मला स्वत:लाच इथे बसण्यासाठी सक्षम असल्याचे वाटत नाही, असे म्हणत धनखड उभे राहिले आणि हात जोडून निघून गेले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com