Pawar Vs Thackeray : विधानसभेत सगळेच खोके म्हणणाऱ्या राज ठाकरेंना अजित पवारांनी डिवचले; म्हणाले, 'कधी निवडणूक...'

Ajit Pawar Criticizes Raj Thackeray : राज ठाकरे हे गुढी पाडव्याला मनसेची जाहीर सभा घेणार आहेत. त्या दिवशी अजित पवारांच्या टीकेला काय प्रत्युतर देतात याकडे मनसे कार्यकर्त्यांचे लक्ष असणार आहे.
Ajit Pawar Raj Thackeray
Ajit Pawar Raj Thackeray sarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar News : बीड जिल्ह्यात सतीश भोसले उर्फ खोक्याच्या गुन्हेगारी कृत्यांची चर्चा सुरू आहे. खोक्याला पोलिसांनी अटक देखील केली आहे. खोक्याबाबत बोलताना राज ठाकरे यांनी तुम्ही एका खोक्याभाईचे काय घेऊन बसलात सर्व विधानसभाच खोक्याभाईंनी भरली आहे, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर आशिष शेलार यांनी राज ठाकरेंवर टीका केली होती. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठाकरेंना बोचरा सवाल करत त्यांची कोंडी केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्रकारांनी राज ठाकरे यांच्या खोक्या विषयीच्या विधानविषयी विचारले असता त्यांनी मनसेच्या निवडणुकीतील अपयशावर बोट ठेवत विचारले "तुम्ही कधी निवडून आलाय का?"

अजित पवार यांनी निवडणुकीतील मनसेच्या अपयशावर बोट ठेवून राज ठाकरेंवर पलटवार केला आहे. त्यावेळी राज ठाकरे हे गुडी पाडव्याला मनसेची जाहीर सभा घेणार आहेत. त्या दिवशी या टीकेला काय प्रत्युतर देतात याकडे मनसे कार्यकर्त्यांचे लक्ष असणार आहे.

Ajit Pawar Raj Thackeray
Ambadas Danve On Kunal Kamra : फडणवीस म्हणतात, माफी मागा तर दानवे म्हणाले, गरज नाही! कुणाल कामराच्या गीताने राजकीय सूर बिघडले...

आशिष शेलारांनी सुनावले

आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हटले होते की, आपलं अस्तित्व दाखवून देण्यासाठी एखादं वक्तव्य करणं आणि आपल्याकडे ध्यान आकर्षित करून घेणं हे संबंध महाराष्ट्राला आता कळून चुकलं आहे. ज्यांनी जनतेचे काम केलं त्यांना महाराष्ट्राच्या जनतेने निवडून दिले असून ते विधानसभेत बसले आहे. मात्र ज्यांना निवडून येता येत नाही तसेच जनता निवडून देत नाही. ते विधानसभेत न जाता विधान करण्याच्या कार्यक्रमात व्यस्त आहेत.

राज ठाकरे मनातलं बोलणार

मनसे गुढी पाडव्याला मेळावा घेणार आहे. या मेळाव्यात राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. मागे एका कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे म्हणाले, गुढी पाडव्याच्या मेळावाला सगळं स्पष्ट बोलणार आहे. त्यामुळे राज ठाकरे या मेळाव्यातून आपल्या टीकारांना काय उत्तर देणार तसेच महापालिका निवडणुकीसाठी महायुतीसोबत जाणार की नाही? याचे स्पष्ट संकेत मिळण्याची शक्यता आहे.

Ajit Pawar Raj Thackeray
BJP MLA Monika Rajale : मी 'लाडकी बहीण', आमदारकीची हॅटट्रिक साधणाऱ्या राजळेंना हवे मंत्रिपद!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com