BJP MLA Monika Rajale : मी 'लाडकी बहीण', आमदारकीची हॅटट्रिक साधणाऱ्या राजळेंना हवे मंत्रिपद!

Mahayuti BJP MLA Monika Rajale MLA Shivaji Kardile Ministerial Posts: महायुती आमदारांच्या सत्कार कार्यक्रमात मंत्रि‍पदावरून भाजप आमदार मोनिका राजळे आणि आमदार शिवाजी कर्डिले यांच्यात राजकीय टोलेबाजी रंगली.
BJP MLA Monika Rajale
BJP MLA Monika RajaleSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : भाजप आमदार मोनिका राजळे यांची विधानसभेत तिसरी टर्म आहे. महायुतीतील विजयानंतर त्यांना मंत्रिपद मिळेल, अशी चर्चा होती. पण अहिल्यानगर जिल्ह्याच्या वाट्याला फक्त एकच मंत्रिपद आले. ही खदखद काल महायुतीच्या आमदारांच्या सत्कार कार्यक्रमात बाहेर आली.

आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासह मोनिका राजळे यांनीही मंत्री पदासाठी इच्छुक असल्याचे स्पष्ट केले. सर्व आमदारांमध्ये आपण एकमेव 'लाडकी बहीण' असल्याचा दावा करत, मंत्रिपदाचे दावेदार असल्याचे सांगितले.

विधानसभा निवडणुकीत अहिल्यानगर जिल्ह्यात 12 पैकी 10 जागांवर महायुतीच्या (Mahayuti) आमदारांनी यश मिळवले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे महायुतीच्या आमदारांचा सत्कार करण्यात आला. बँकेचे अध्यक्ष तथा भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. या राजकीय कार्यक्रमात आमदारांनी चांगलीच टोलेबाजी केली.

BJP MLA Monika Rajale
Kunal Kamra Studio Attack : आधी तोडफोड करणाऱ्या उपमुख्यमंत्री शिंदेंच्या कार्यकर्त्यांवर FIR करा; अंजली दमानियांनी कायद्यानं घेरलं

शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात चुरशीची निवडणूक झाली. मोनिका राजळे यांचा पराभव होईल, असे वाटत होते. त्यांची हॅटट्रिक हुकणार असे वाटत होते. पण त्यांनी विजय खेचून आणला. मतमोजणीच्या शेवटच्या टप्प्यात विजयमार्गावर मार्ग्रस्थ झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार प्रतापराव ढाकणे आणि अपक्ष उमेदवार माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्याशी लढत राजळे यांनी विजश्री मिळवला.

BJP MLA Monika Rajale
Satyajeet Tambe : राजकारण नाही, तर राजकारणी बिघडलेत; विधान परिषदेतील कामकाजावर आमदार तांबेंची टिप्पणी

भाजपच्या मोनिका राजळे यांना 98 हजार 630 मते घेत विजय मिळवला. त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार प्रतापराव ढाकणे यांना 78 हजार 881 मते मिळाली. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अपक्ष उमेदवार माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांना 57 हजार 235 मते मिळाली.

मोनिका राजळे यांनी विजयाची हॅटट्रिक साधताना, त्यांचे मंत्रिपद निश्चित असल्याचे मानले जाऊ लागले. मात्र, अहिल्यानगर जिल्ह्याच्या वाट्याला एकच मंत्रिपद आले. वरिष्ठ असल्याने त्या मंत्रिपदाची माळ राधाकृष्ण विखे यांच्या गळ्यात पडली. महायुतीकडून मोनिका राजळेंसह शिवाजी कर्डिले, अमोल खताळ, विठ्ठलराव लंघे देखील मंत्रि‍पदासाठी इच्छुक होते.

महायुतीच्या आमदारांच्या सत्कार कार्यक्रमात मोनिका राजळे यांनी सर्व आमदारांमध्ये आपण एकमेव 'लाडकी बहीण' असल्याचा दावा करत मंत्री पदावर दावा नोंदवला. आगामी काळात मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यास, पहिली संधी आपल्याला मिळावी, असे अप्रत्यक्षपणे आमदार राजळे यांनी सूचित केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com