Chandrakant Khaire v/s Ambadas Danve News : शिंदे- खैरे वादावर अंबादास दानवे यांचे हाताची घडी तोंडावर बोट!

Raju Shinde and Chandrakant Khaire involved in a dispute, with Ambadas Danve distancing himself from the conflict. : राजू शिंदे यांना शिवसेनेत आणण्यात अंबादास दानवे यांची प्रमुख भूमिका होती. चंद्रकांत खैरे यांचा विरोध डावलून दानवे यांनी राजू शिंदे यांना पक्षात प्रवेश देत विधानसभेची उमेदवारी दिली होती.
Ambadas Danve, Chandrakant Khaire News
Ambadas Danve, Chandrakant Khaire NewsSarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती अद्यापही सुरूच आहे. छत्रपती संभाजीनगरमधील पश्चिम विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या मशाल चिन्हावर निवडणूक लढवलेले राजू शिंदे यांनी नुकताच शिवसेनेतील आपल्या विधानसभा प्रमुख पदासह सदस्यत्वाचा राजीनामा दिला. या राजीनामा पत्रात शिंदे यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या बद्दलची नाराजी व्यक्त केली, तर अंबादास दानवे यांचे आभार मानले.

यानंतर खैरे (Chandrakant Khaire) यांनी पत्रकार परिषद घेत राजू शिंदे ब्लॅकमेलर असल्याचा आरोप करत तो फक्त पक्षाला डिस्टर्ब करायला आला होता, असा आरोप केला. त्यावर राजू शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत मी जर तोंड उघडलेतर शिवसेनेतील निष्ठावंत सैनिक चंद्रकांत खैरे यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा दिला. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मात्र सावध भूमिका घेत स्वतःला या वादापासून दूर ठेवले आहे.

माध्यमांनी या संदर्भात बोलते करण्याचा प्रयत्न केला तेव्हा चंद्रकांत खैरे यांच्या आरोपावर आपल्याला काहीही बोलायचे नाही. ते आमचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांचे आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असते, एवढेच बोलून अंबादास दानवे या विषयावर हाताची घडी तोंडावर बोट याप्रमाणे वागताना दिसत आहेत. या उलट राजू शिंदे यांच्या राजीनामा पत्रात चंद्रकांत खैरे यांच्या नाराजीचा उल्लेख झाल्याने याचा थेट संबंध खैरे यांनी अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्याशी जोडला आहे.

Ambadas Danve, Chandrakant Khaire News
Chandrakant Khaire On Devendra Fadnavis : सहा महिन्यात पाणी देतो सांगून देवेंद्र फडणवीस यांनी फसवणूक केली! चंद्रकांत खैरे यांचा आरोप

अंबादास दानवे हे मनमानी पद्धतीने काम करतात, मला कधीही बोलवत नाही असे म्हणत विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्नही त्यांनी केला होता. ऑगस्टपर्यंत ते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते राहणार आहेत, असा खोचक टोलाही खैर यांनी लगावला होता. राजू शिंदे यांना शिवसेनेत आणण्यात अंबादास दानवे यांची प्रमुख भूमिका होती. चंद्रकांत खैरे यांचा विरोध डावलून दानवे यांनी राजू शिंदे यांना पक्षात प्रवेश देत विधानसभेची उमेदवारी दिली होती.

Ambadas Danve, Chandrakant Khaire News
Ambadas Danve On Mahayuti News : पुढील निवडणुका येईपर्यंत महाराष्ट्रात एप्रिल फूल उत्सव सुरूच राहणार! अंबादास दानवेंची खोचक टीका

त्यामुळे नाराज असलेल्या चंद्रकांत खैरे यांनी विधानसभा निवडणुकीत आपले काम न करता विरोधकांना मदत होईल, अशी भूमिका घेतली होती असा आरोप शिंदे यांनी केला. शिंदे- खैरे यांचे एकमेकांवरील आरोप प्रत्यारोपाचे सत्र सुरूच आहे. यामध्ये न पडता अंबादास दानवे यांनी या वादापासून अंतर राखले आहे. खैरे यांच्यावर कुठलीही टीका न करता ते माझे जेष्ठ नेते आहेत, त्यांचे मला नेहमी मार्गदर्शन मिळत असते असे म्हणत खैरे यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न दानवे यांच्याकडून सुरू आहे.

Ambadas Danve, Chandrakant Khaire News
Shivsena UBT News : विधानसभेला आयात केलेले अन् पक्षाने निष्ठावंत म्हणून उमेदवारी दिलेले सगळेच पळाले! उद्धव ठाकरेंना मराठवाड्यात फटका..

मातोश्रीवर चंद्रकांत खैरे यांच्यापेक्षा अंबादास दानवे यांचे वजन वाढले असल्यामुळे स्थानिक पातळीवर चंद्रकांत खैरे यांची दखलच न घेण्याची भूमिका गेल्या वर्षभरापासून अंबादास दानवे आणि त्यांच्या समर्थकांनी घेतली. राजू शिंदे यांच्या पक्ष सोडून जाण्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यावर काय भूमिका घेतात? खैरे- दानवे यांच्या वादावर काही तोडगा काढण्यात त्यांना यश मिळते का? हे लवकरच स्पष्ट होईल.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com