Assembly Monsoon Session: विरोधकांच्या 'त्या' आरोपांतील अजितदादांनी हवाच काढली; म्हणाले,...

Maharashtra Assembly Monsoon Session 2024 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मी दहाव्यांदा राज्याचा अर्थसंकल्प सादर केलाय. आम्ही नवखे नसल्याचे सांगत अंमलबजावणीसाठी निधी असल्यानेच विवीध योजनांची घोषणा केल्याचे स्पष्ट केले.
Ajit Pawar in Maharashtra Monsoon Session
Ajit Pawar in Maharashtra Monsoon SessionSarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar News : राज्याचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्यावर बोलताना विरोधकांनी अर्थसंकल्पावर सडकून टीका केली होती. हा केवळ घोषणांचा अर्थसंकल्प असून अंमलबजावणीसाठी तेवढा फंड आपल्याकडे आहे का? याचा देखील विचार करेल नसल्याचा आरोप केला होता.

विरोधकांनी केलेले हे सर्व आरोप खोडून काढताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मी दहाव्यांदा राज्याचा अर्थसंकल्प सादर केलाय. आम्ही नवखे नसल्याचे सांगत अंमलबजावणीसाठी निधी असल्यानेच विवीध योजनांची घोषणा केल्याचे स्पष्ट केले.

सगळ्या गोष्टी त्यामध्ये बसत असल्याने हा सगळा विचार करत अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यामुळे विरोधकांनी याची चिंता करू नये. मी नवखा नाही शुक्रवारी सादर केलेला हा अर्थसंकल्प मी दहाव्यांदा अर्थसंकल्प सादर केला आहे. उद्या निर्णय घेतल्यानंतर अंमलबजावणीसाठी तेवढा फंड आपल्याकडे आहे का? सगळ्या गोष्टी त्यामध्ये बसत आहे का? हा सगळा विचार करत अर्थसंकल्प सादर केला असल्याचे अर्थमंत्री पवार यांनी सांगत विरोधकांच्या आरोपातील हवाच काढली.

मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलींना शिक्षणासाठी आता 100 टक्के उच्च शिक्षण मिळणार आहे. केंद्राच्या वाढीत देशाचा विचार केला तर राज्याचा हिस्सा केवळ 15 टक्क्यांच्या जवळपास आहे. आपले उद्दीष्ट 50 ते 60 हजार कोटींनी वाढत असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

Ajit Pawar in Maharashtra Monsoon Session
Video Ajit Pawar : मध्य प्रदेशमध्ये गेम चेंजर ठरलेली योजना महाराष्ट्रात! 'लाडकी बहीण योजने'तून महिन्याला मिळणार दीड हजार रुपये

जीएसटी,महसूल संकलनात वाढ

अर्थसंकल्पात (Maharashtra Budget) काही रक्कम कमी वाटत असली तरी पुरवणीत आम्ही ती रक्कम वाढविणार आहोत. 16 व्या वित्त आयोगात भरीव मदत मिळणार आहे. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. ठाणे, मुंबई आणि बृहमुंबईतील पेट्रोल डिझेलचा दर कमी केला आहे. गेल्या काही दिवसापासून जीएसटी आणि महसूल संकलनात वाढ होत असल्याचे अजित पवार यांनी संगितले.

शेतकरी, युवा वर्गाला केली मदत

राज्यातील शेतकरी वर्गाला वीज माफी देण्याची आमची इच्छा होती, त्यामुळे विजेची माफी दिली आहे. लाभार्थींच्या खात्यात पैसे जाणार आहेत. गायीच्या दुधाला 5 रुपये मदत दिली. राज्यातील युवकांना शिक्षणासाठी मदत केली आहे. ॲप्रेंटशिपमध्ये 10 हजार रुपये मिळणार आहेत. त्यासोबतच कापूस, सोयाबीन संदर्भात देखील घोषणा केल्याप्रमाणे मदत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Ajit Pawar in Maharashtra Monsoon Session
Ajit Pawar Maharashtra Budget 2024: शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या बजेटमधील महत्वाच्या घोषणा; शेतकऱ्यांना वीज बिल माफ

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com