Ajit Pawar : अजित पवार खेळाच्या मैदानात उतरणार, अध्यक्षपदासाठी चौथ्यांदा थोपटले दंड!

Maharashtra Olympic Association Election : अजित पवार यांनी महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक निवडणुकीत अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे. यापूर्वी तीन वेळा ते अध्यक्ष राहिले आहेत.
Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar News : महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक संघटनेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे. आतापर्यंत अजित पवार तीन वेळा अध्यक्षपद म्हणून कार्यरत राहिले आहेत. आता ते चौथ्यांदा अध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक संघटनेच्या निवडणुकीत अर्ज भरण्याची अंतिम तारीख ११ ऑक्टोबर आहे. अजित पवार यांनी २०१३ पासून महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्षपद भूषवले आहे.

यंदा अजित पवारांनी महाराष्ट्र राज्य खो-खो संघटनेकरवी ऑलिंपिक संघटनेच्या अध्यक्षपदाचा अर्ज दाखल केला आहे. २००६ ते २०१८ यादरम्यान महाराष्ट्र राज्य खो-खो संघटनेचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे. सात वर्षांचा कुलींग ऑफ पीरियड झाल्यानंतर २०२५ मध्ये ते पुन्हा राज्य खो-खो संघटनेच्या अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत.

Ajit Pawar
Uddhav Thackrey Politics: उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफीच्या प्रश्नावर केली महायुतीची राजकीय कोंडी?

जाधव, शिरोळेंचाही अर्ज

महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक संघटनेच्या निवडणुकीसाठी अजित पवार यांच्यासह इतर व्यक्तींनीही अर्ज दाखल केला. यामध्ये चंद्रजीत जाधव, प्रदीप गंधे, स्मिता शिरोळे, संजय वळवी, बाबुराव चांदेरे, मनोज भोरे, संदीप ओंबासे व रणधीर या व्यक्तींचा समावेश आहे. चंद्रजीत जाधव यांनी खजिनदार व सरचिटणीस या दोन पदांसाठी अर्ज दाखल केला आहे.

Ajit Pawar
Nashik crime: भाजपचा पाय खोलात, दोन माजी नगरसेवकांपाठोपाठ भाजपच्या तिसऱ्या नेत्यावर गोळीबार प्रकरणी गुन्हा दाखल

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com