Amol Mitkari : गुन्हेगाराला वाचविण्यासाठी मिटकरींचा पोलिस अधीक्षकांवर दबाव? ऑडिओ क्लिप व्हायरल

Amol Mitkari Viral Audio Clip : मिटकरींकडून अकोल्यातील सराईत गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा रंगली आहे.
amol mitkari bachchan singh
amol mitkari bachchan singhsakarnama
Published on
Updated on

जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंह आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी ( Amol Mitkari ) यांच्या दोघांमधील एका संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. अकोल्यातील एका गुन्हेगारावर गुन्हा दाखल न करण्यासाठी आमदार मिटकरींनी पोलिस अधीक्षक सिंह यांच्याकडे मागणी केल्याचे या क्लिपमध्ये आहे. आमदार नितेश राणे यांनी पोलिसांसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांचा पोलिसांवर दबाव वाढत असल्याचा आरोप आहे. अशातच आता आमदार मिटकरींची कथित 'ऑडिओ क्लिप' समोर आली आहे. ( Amol Mitkari Audio Clip Viral )

amol mitkari bachchan singh
Sanjay Raut : "भाजपचे 10 बाप झाले आहेत, शिवसेना ही...", राऊतांचं फडणवीसांना सडेतोड प्रत्युत्तर

भाजप आमदार नितेश राणे यांनी पोलिसांबाबत वक्तव्य केल्यानंतर त्याचे पडसाद राज्यभर उमटले. "पोलिस आमच्या राज्यात आमच्यावर काय करणार? त्यांना जागेवर राहायचे आहे की नाही? ते माझ्या भाषणाचे चित्रीकरण करून केवळ बायकोला दाखवू शकतील. पोलिस माझे काहीही बिघडवू शकत नाहीत," असे वादग्रस्त विधान भाजप आमदार नितेश राणेंनी केलं होते. त्यानंतर विरोधकांनी हे प्रकरण चांगलेच लावून धरले. पोलिसांवर सत्ताधाऱ्यांचा दबाव असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आता पुन्हा सत्तेत सहभागी असलेल्या राष्ट्रवादी (अजित पवार ) गटाचे आमदार अमोल मिटकरी हे अकोल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांच्यावर एकप्रकारे दबाव टाकत असल्याचं एका कथित ऑडिओ क्लिपवरून समोर आलं आहे. अकोल्यातील एका सराईत गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे.

amol mitkari bachchan singh
Sunil Tatkare : "2019 मध्ये अजित पवारांना उपमुख्यमंत्री केलं नसतं, तर...", तटकरेंचं मोठं विधान

सतीश नावखेडे या गुन्हेगारासाठी अमोल मिटकरींनी पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांच्याशी फोनवरून संवाद केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. वानखेडेवर गुन्हा दाखल केल्यास थेट मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना बोलेन, असा दबाव मिटकरी बच्चन सिंह यांच्यावर टाकत आहेत. तसेच, बानखेडेवर गुन्हे दाखल न करण्याची मागणी मिटकरींनी बच्चन सिंह यांच्याकडे केली आहे.

ऑडिओ क्लिपमध्ये काय?

ऑडिओ क्लिपमध्ये मिटकरी पोलिस अधीक्षक सिंह यांना म्हणतात, "आपण ( बच्चन सिंह ) कायम माझ्याशी मोठ्याने बोलता. मी एक सत्ताधारी आमदार आहे. येत्या अधिवेशनात मी हा मुद्दा मांडणार आहे. जर एखादा गुन्हेगार ( सतीश वानखेडे ) सुधारण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला संधी दिली पाहिजे. सदर गुन्हेगार हा माझ्या पक्षाशी संबंधित नाही किंवा तो माझा कार्यकर्ता आहे. याबाबत मी तुमच्याशी इथून पुढे बोलणार नाही. बोलायचे असल्यास मी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांशी बोलेन."

amol mitkari bachchan singh
Amol Kolhe : अमोल कोल्हेंनी अजित पवारांना डिवचले; 'ज्यांनी बोटाला धरून चालवलं, त्यांच्याशी...'

कोण आहे सतीश वानखेडे!

सतीश वानखेडे हा अकोल्यातील कृषीनगर परिसरातील पंचशीलनगर भागातला एक सराईत गुन्हेगार आहे. अकोल्यातील विविध पोलिस स्टेशनमध्ये वानखेडेवर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. 2015 मध्ये वानखेडेवर अकोला पोलिसांनी तडीपारीचीदेखील कारवाई केली आहे. तसेच, धनंजय बिल्लेवार या व्यक्तीवर वानखडेने जीवघेणा हल्ला केला होता. या हल्यात बिल्लेवारच्या हाताची बोटे कापली होती.

( Edited By : Akshay Sabale )

R

amol mitkari bachchan singh
Sharad Pawar: 'मानसपुत्रा'मुळे पवारांना मनस्ताप! म्हणाले,सगळं देऊनही पाच टक्केसुद्धा निष्ठा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com