Sanjay Raut : "भाजपचे 10 बाप झाले आहेत, शिवसेना ही...", राऊतांचं फडणवीसांना सडेतोड प्रत्युत्तर

Mahavikas Aghadi Seat Sharing : संजय राऊतांनी महाविकास आघाडीच्या जागावाटपाबद्दलही भाष्य केलं आहे.
Devendra Fadnavis | Sanjay Raut
Devendra Fadnavis | Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर बुधवारी हल्लाबोल केला होता. निवडणुका आल्यावर उद्धव ठाकरे मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचं षडयंत्र सुरू असल्याचं म्हणतील.

पण, कुणाच्या बापाच्या बापाचा बाप आला, तरी मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही, असं विधान फडणवीसांनी केलं होतं. याला संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "भाजपच्या बापाचा पत्ता आहे का?" असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

Devendra Fadnavis | Sanjay Raut
Sunil Tatkare : "2019 मध्ये अजित पवारांना उपमुख्यमंत्री केलं नसतं, तर...", तटकरेंचं मोठं विधान

संजय राऊत म्हणाले, "भाजपचा बाप आला, तरी मुंबई वेगळी होणार नाही. आमचा बाप बाळासाहेब ठाकरे आहेत. पण, भाजपच्या बापाचा पत्ता आहे का? तुम्हाला आता 10 बाप झाले आहेत. अजित पवार, मिंधे गट हे तुमचे बाप आहेत. भाजपला खरा बाप असता, तर खोकेवाले घेऊन महाराष्ट्रात राजकारण करावं लागलं नसतं. शिवसेना ही एकाच बापाची आहे.

भाडोत्री लोक घेऊन तुम्हाला राज्य चालवता येणार नाही." या वेळी रणजित सावरकर यांच्याबद्दल प्रश्न विचारल्यावर संजय राऊतांनी "कोण रणजित सावरकर? मी फक्त वीर सावरकर यांना ओळखतो," असं म्हटलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"महाराष्ट्रातील संस्था, उद्योग हा गुजरातकडे वळवला जात आहे. उद्या मुंबईही गुजरातला देतील. महानंदचे चेअरमन राधाकृष्ण विखे-पाटलांचे मेहुणे होते. मेहुणे-मेहुणे पाहुणे... आणि पाहुण्यांनी महानंदा दिले गुजरातला... महाराष्ट्र सरकारची एक डेअरी तुम्ही चालवू शकत नाही. स्वत:च्या डेअऱ्या कशा चालू आहेत?" असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे.

Devendra Fadnavis | Sanjay Raut
Loksabha Election 2024 : '23' आकडा ठरवणार बबनराव घोलप यांचं राजकीय भवितव्य? घोटाळा प्रकरणात कोर्टात उद्या सुनावणी

"महानंदा डेअरीबरोबर गोरेगावात असलेली 50 एकरची जागा विकण्याचा घाट घातला जातोय. यात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार सामील आहेत. ही जमीन अदानींना देणार आहेत," असा आरोपही संजय राऊतांनी केला आहे.

"महाविकास आघाडीत एकवाक्यता आहे. आमचं जागावाटप अत्यंत काळजीपूर्वक सुरू आहे. 27 फेब्रुवारीला जागावाटपाबाबत अंतिम निर्णय घेणार आहोत," असंही राऊतांनी सांगितलं.

R

Devendra Fadnavis | Sanjay Raut
Amol Kolhe : अमोल कोल्हेंनी अजित पवारांना डिवचले; 'ज्यांनी बोटाला धरून चालवलं, त्यांच्याशी...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com