IPS Anjali Krishna News : सोलापूर जिल्ह्यातील कुर्डू येथे अवैध मुरूम उत्खनन करणाऱ्यांवर कारवाईसाठी IPS अधिकारी अंजली कृष्णा गेल्या होता. त्यामात्र, तेथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन केला. अजित पवार यांनी अंजली कृष्णा यांना कारवाई न करण्याचे आदेश दिले. तसेच माझा निरोप तहसीलदारांना द्या, असे सांगितले. येवढी डॅरिंग म्हणत कारवाई करू असा दम देखील दिला. मात्र, अजित पवारांना ज्या कार्यकर्त्यांसाठी अंजली कृष्णा यांना झापले त्याच कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.
ग्राम महसूल अधिकारी प्रीती शिंदे यांच्या फिर्यादीवरून शासकीय कामात आणल्याप्रकरणी कुर्डू प्रकरणात 15 ते 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये नितीन माळी, संतोष कापरे, बाबा जगताप आदींचा समावेश आहे.
दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार, संशयित आरोपींनी कोणतीही परवानगी न घेता दादाराव गोरख माने यांची शेती गट नंबर 575/1 मधील 0.20 आरमधून अंदाजे रक्कम 72 हजाराची 120 ब्रास मुरूम काढला. याप्रकरणी मुरुम अवैद्यरित्या उत्खनन करन चोरी केल्याची तक्रार दाखल झाली आहे. याशिवाय जमाव जमवून सरकारी कामात अडथळा आणला.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसाठी महिला आयपीएस अधिकाऱ्याला खडसावत आहेत, हे त्यांना शोभणारे नाही. ते प्रत्येकाला शहानपण शकवत असतात मात्र, त्यांनी महिला अधिकाऱ्यावर कारवाई केली तर आम्ही त्यांना सोडणार नाही, असा इशारा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिला. तसेच अजित पवारांनी महिला अधिकाऱ्याची माफी मागावी, अशी मागणी देखील केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.