Chhagan Bhujbal : मंत्रि‍पदापासून वंचित छगन भुजबळ भाजपमध्ये जाणार? अजितदादांना कवितेतून इशारा

Ajit Pawar NCP mla Chhagan Bhujbal BJP : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून आपल्याला थेट संपर्क साधण्यात आला नाही. मात्र, समीर भुजबळ यांच्याशी सुनील तटकरे, प्रफुल पटेल यांनी संपर्क साधल्याचे भुजबळ यांनी सांगितले.
 Chhagan Bhujbal BJP
Chhagan Bhujbal BJPsarkarnama
Published on
Updated on

Chhagan Bhujbal News : मंत्रि‍पदापासून वंचित राहिलेले छगन भुजबळ मोठा निर्णय घेत राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार असल्याच्या चर्चा आहेत. भुजबळ भाजपमध्ये जाणार का? असा प्रश्न विचारला जातो आहे. या प्रश्नाचे उत्तर स्वतः छगन भुजबळ यांनी एका खासगी मराठी वृत्तवाहिनीला बोलताना दिले आहे.

'लोक म्हणातायेत की भाजपमध्ये जा, समता परिषदेतील काही जण म्हणत आहेत की स्वतःचा पक्ष काढा. प्रत्येक जण आपलं मत व्यक्त करत आहे. समता परिषद ही अखिल भारतीय आहे. त्यामुळे सर्वांशी चर्चा करून योग्य निर्णय घेईल. जाण्यासाठी त्यांच्याकडेही रस्ता उघडा पाहिजे', असे छगन भुजबळ म्हणाले.

कब तक सहें ये अपमान हम... सुनते-सुनते दिल ही थक जाता है, जब वार हो स्वाभिमान पर हर बार... तो सब्र का भी अंत हो जाता है, चुप रहकर क्या मिलता है आखिर...दिल का दर्द ही बढ़ जाता है, उठानी पड़ती है आवाज़..जब पानी सर से उपर चढ़ जाता है! ही शायरी म्हणत छगन भुजबळ यांनी अजित पवार यांचे नाव न घेता मोठं पाऊल उचलण्याचा इशारा दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून आपल्याला थेट संपर्क साधण्यात आला नाही. मात्र, समीर भुजबळ यांच्याशी सुनील तटकरे, प्रफुल पटेल यांनी संपर्क साधल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

 Chhagan Bhujbal BJP
Santosh Deshmukh Murder Case : बीड सरपंच हत्येप्रकरणी मोठी अपडेट; उद्या सकाळी मुख्यमंत्री सभागृहात करणार 'ही' घोषणा

'ते' आंदोलन चुकीचे

छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळाले नसल्याने समता परिषदेच्या कार्यकर्त्याकडून आंदोलन करण्यात येत आहे. समता परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून अजित पवार यांच्या फोटोला जोडे मारण्यात आले. तसेच अजित पवार यांच्या बद्दल अपशब्द वापरण्यात आले. त्यावर बोलताना भुजबळ म्हणाले, असा प्रकारच्या आंदोलनाला आपला विरोध आहे. तसेच मी स्पष्ट केले आहे की असे आंदोलन करणाऱ्यांशी माझा काहीच संबंध नाही. असं करणार समता परिषदेचा कार्यकर्ते नाहीत. चुकीचे बोलणाऱ्यांना पाठींबा नाही.

स्वतंत्र पक्ष काढणार नाही

छगन भुजबळ यांनी सांगितले की स्वतंत्र पक्ष काढण्यासाठी प्रचंड सामग्री लागते. ओबीसीमध्ये 300-400 जाती आहेत. यामध्ये नेते उभे करण्यासाठी मोठ्या समाग्रीची आवश्यकता असते ती सोपी गोष्ट नाही. शिवाय सरकार येणार नसेल तर ही शेवटी रस्त्यावरची लढाई होती. सरकारमध्ये राहून अनेक गोष्टी मिळवता येतात. आम्ही अलिकडे ओबीसींच्या विद्यार्थ्यांना स्काॅलरशीप, वस्तीगृह मिळवले अनेक सुविधा मिळवल्या. दरम्यान, स्वतंत्र पक्षापेक्षा आता कुठे मान सन्मानाने असरा मिळाला तर ठीक हे नाहीत आमची लढाई आम्ही लढू, असे देखील भुजबळ म्हणाले.

 Chhagan Bhujbal BJP
MLA Amit Deshmukh News : लातूरसह राज्यात गुन्हेगारी वाढली, अमित देशमुखांनी व्यक्त केली चिंता!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com