Rohit Pawar : अजितदादांचे 'एवढे' आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात; रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणुकीत 10 पैकी 8 जागांवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला विजय मिळाला आहे. तर, अजित पवारांच्या राष्ट्रवादीची फक्त 1 जागा निवडून आली आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवरआमदारांमध्ये धाकधूक वाढली आहे.
Ajit Pawar | Sharad Pawar | Rohit Pawar
Ajit Pawar | Sharad Pawar | Rohit Pawarsarkaranama

Sharad Pawar Vs Ajit Pawar : लोकसभा निवडणुकीनंतर ( lok Sabha Election 2024 ) आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत आयोजित केलेल्या बैठकीला आमदारांनी दांडी मारल्याचं समोर आलं आहे. यातच आमदार रोहित पवार यांनी मोठा दावा केला आहे. त्यामुळे अजित पवार गटात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

अजित पवार ( Ajit Pawar ) गटातील 18 ते 19 आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याचं सांगून रोहित पवार यांनी खळबळ उडवून दिली आहे. त्यासह 15 दिवसांत आमदारांना निर्णय घ्यावा लागणार आहे, असं सांगत रोहित पवारांनी एकप्रकारे 'अल्टिमेटम' दिला आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

रोहित पवार ( Rohit Pawar ) म्हणाले, "पुढील 15 दिवसांत अजित पवार गटातील आमदारांना निर्णय घ्यावा लागणार आहे. कारण, शरद पवार यांनी विधानसभेची तयारी सुरू केली आहे. विधानसभेसाठी 30 उमेदवारांची नावं शरद पवारांनी 'फिक्स' केली आहेत."

"अजित पवार गटात असलेल्या मंत्र्यांविरोधात उमेदवार 'फायनल' झाले आहेत. 18 ते 19 आमदार संपर्कात आहेत. त्यातील किती आमदारांना पक्षात घ्यायचं हे शरद पवार आणि जयंत पाटील ठरविणार आहेत," असं रोहित पवार सांगितलं.

बारामतीतून विधानसभा लढविणार?

बारामतीतून विधानसभा लढविणार का? या प्रश्नावर रोहित पवारांनी म्हटलं, "मी बारामतीमधून विधानसभा निवडणूक लढविणार नाही. कर्जत-जामखेडला मी सोडू शकत नाही. कारण, तेथील जनतेनं मला आशीर्वाद आणि ओळख दिली आहे. संघर्ष कसा करायचा हे शिकवलं. त्यामुळे मी कर्जत-जामखेडला सोडू शकत नाही. पण, बारामतीत शरद पवार योग्य उमेदवार देतील."

Ajit Pawar | Sharad Pawar | Rohit Pawar
Uddhav Thackeray : मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांना धक्का बसण्याची शक्यता, शिंदे गटातील आमदार ठाकरेंच्या संपर्कात?

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं 4 जागा लढविल्या होत्या. त्यातील फक्त 1 म्हणजे सुनील तटकरे यांचा रायगडमधून विजय झाला. तर, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं 10 जागा लढविल्या होत्या. त्यातील 8 जागांवर उमेदवार निवडून आले आहेत. विधानसभेला हेच चित्र राहण्याची भीती अजित पवार गटातील आमदारांमध्ये सुरू असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे पुन्हा स्वगृही काही आमदार परतण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com