Ajit Pawar News : अजित पवारांशी संबंधित शिखर बँक घोटाळा प्रकरणाचा तपास बंद करा; आर्थिक गुन्हे विभागाची कोर्टाला विनंती

Political News : या कथित घोटाळ्याचा तपास बंद करण्याचा अर्ज मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने विशेष न्यायालयाकडे सादर केला आहे.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या (शिखर बँक) कथित 25 हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे. शिखर बँकेच्या कथित घोटाळ्याप्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना येत्या काळात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. या कथित घोटाळ्याचा तपास बंद करण्याचा अर्ज मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने विशेष न्यायालयाकडे सादर केला आहे.

पोलिसांनी या प्रकरणात ‘सी’ समरी पण सादर केली आहे. न्यायालयात या प्रकरणी आता 15 मार्च रोजी सुनावणी होईल. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांनी विशेष न्यायालयात ‘सी’ समरी अहवाल सादर केला आहे.

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणी विशेष न्यायालयात अतिरिक्त क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. पोलिसांनी प्रकरणात 'सी' समरी रिपोर्ट दाखल केला आहे. मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने अजित पवार यांच्याविरोधात काही ठोस सापडले नसल्याचा निष्कर्ष काढला आहे. (Ajit Pawar News)

Ajit Pawar
Basavraj Patil : भाजपवासी बसवराज पाटील यांच्यावर फुलांची उधळण; काँग्रेस निष्ठावंतांचा राग मात्र कायम...

क्लोजर रिपोर्ट केला सादर

आर्थिक गुन्हे शाखेने तपासबंद अहवाल क्लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर केला आहे. सुनावणीच्या दिवशी तो न्यायालयासमोर येईल. या प्रकरणी न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. न्यायालयाने जर हा अहवाल स्वीकारला तर अजित पवार या घोटाळ्यातून सहिसलामत बाहेर पडतील.

नव्याने तपासात काहीच हाती लागले नाही

चुकीच्या माहितीच्या आधारे एकदा गुन्हा दाखल करण्यात येतो. गुन्हा दिवाणी स्वरूपाचा असतो. तेव्हा पोलिस सी समरी अहवाल न्यायालयात दाखल करतात. या प्रकरणात नव्याने तपास करूनसुद्धा काही हाती लागले नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे. दरम्यान, 2022 मध्ये आर्थिक गुन्हे शाखेने नव्याने तपास करण्यासाठी न्यायालयाकडून परवानगी घेतली होती, तर जुलै 2023 मध्ये अजित पवार (Ajit Pawar) हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कोर्टात आव्हान देणार

विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांनी विशेष न्यायालयाचे ‘सी’ समरी अहवाल सादर केला आहे. न्या. राहुल रोकडे यांच्यापुढे या प्रकरणात सुनावणी होईल. 15 मार्च रोजी ही सुनावणी होईल. दरम्यान, आमच्या याचिका प्रलंबित असताना तपास यंत्रणेने क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे, त्याला आव्हान देणार असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे वकील सतीश तळेकर यांनी सांगितले.

संजय राऊतांनी केली टीका

या प्रकरणी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्य सरकारवर घणाघात केला. या घोटाळा प्रकरणात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis), जे. पी. नड्डा, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर द्यायला हवा. भ्रष्टाचार सहन करणार नाही, असे ते म्हणाले होते. भ्रष्टाचार संपविण्याची मोदी गॅरंटी होती. त्याचे काय झाले, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे.

R

Ajit Pawar
Ajit Pawar News : "...तोपर्यंत मी गप्प बसणार नाही," अजितदादांचं शरद पवार, मुख्यमंत्री अन् फडणवीसांसमोर विधान

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com