Basavraj Patil : भाजपवासी बसवराज पाटील यांच्यावर फुलांची उधळण; काँग्रेस निष्ठावंतांचा राग मात्र कायम...

Joined BJP : मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गळ्यात भाजपचा दुपट्टा घालून घेतला. विशेष म्हणजे त्यांनी थेट केंद्रीय नेतृत्वाशी बोलूनच भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यांच्या या प्रेवशाला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते.
Basavraj Patil
Basavraj PatilSarkarnama
Published on
Updated on

- अविनाश काळे

Umarga News : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यापाठोपाठ काँग्रेसचे माजी मंत्री बसवराज पाटील यांनीही नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. चव्हाण यांच्यासारख्याच बसवराज यांच्याही भाजप प्रवेशाच्या चर्चा गेल्या कित्येक महिन्यांपासून जिल्ह्याच्या राजकारणात सुरू होत्या. अखेर अपेक्षेप्रमाणे त्यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गळ्यात भाजपचा दुपट्टा घालून घेतला. विशेष म्हणजे त्यांनी थेट केंद्रीय नेतृत्वाशी बोलूनच भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यांच्या या प्रेवशाला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते.

दरम्यान, भाजपवासी झाल्यानंतर बसवराज पाटील (Basavraj Patil) यांचे काल शुक्रवारी रात्री उमरगा येथे आगमन झाले. सोलापूर मार्गे उमरग्यात आलेल्या पाटील यांच्यावर त्यांच्या समर्थकांनी फुलांची उधळण करत उघड्या जीपमधून मिरवणूकही काढली. समर्थकांचा उत्साह मोठा होता, पण काँग्रेस (Congress) मधील निष्ठावंत मात्र बसवराज यांच्या स्वागतापासून दूरच होते. अनेकांना त्यांचा भाजपमध्ये जाण्याचा निर्णय आवडलेला नाही. त्यामुळे भविष्यात राजकारण करताना त्यांना या नाराजांचे मन वळवावे लागणार आहे.

Basavraj Patil
Congress Bharat Jodo Nyay Yatra : काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा लवकरच महाराष्ट्रात...

उमरगा (Umarga) तालुक्यात येत असताना सोलापूरहून निघालेल्या बसवराज पाटलांचे ठिकठिकाणी स्वागत करून भाजप प्रवेशाबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या. तीन दशकांहून अधिक काळ काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून सर्वसामान्यांमध्ये आपली प्रतिमा निर्माण केल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा मोठा निर्णय घेतला. याची सर्वत्र चर्चाही होत होती, पण पक्ष प्रवेश बराच लांबला.

बसवराज पाटील यांनी आपला निर्णय बदलला की काय? असे वाटत असतानाच अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या भाजप प्रवेशानंतर आठवडाभरातच पाटील यांचाही नियोजित भाजप प्रवेश 27 फेब्रुवारीला देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मुंबईत झालाच. त्यांच्या पक्ष प्रवेशानंतर व्यक्तीनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्यांत कमालीचा उत्साह दिसत असला तरी काँग्रेस पक्षनिष्ठा असलेल्या मतदारांत मात्र निरुत्साहाचे वातावरण दिसून आले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

साखर कारखान्याच्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांशी संबंध असलेल्या पाटील यांनी व्यक्ती आणि पक्ष अशा दोन्ही पातळीवर असंख्य कार्यकर्ते व मतदारांचे पाठबळ मिळवले, पण पक्षांतरांच्या कठोर निर्णयानंतर पक्ष निष्ठावंतांत त्यांच्याबद्दल नाराजीचा सूर दिसतो. आता ही नाराजी कशी दूर करायची, याची व्यूव्हरचना पाटील यांना आखावी लागणार आहे. दरम्यान, या निमित्ताने कार्यकर्ते तेच पण त्यांच्या गळ्यातील उपरण्याचा रंग आणि डोक्यावरील चिन्ह बदलल्याचे पाहायला मिळाले.

बसवराज पाटील शुक्रवारी सायंकाळी मुंबईहून परतले. सोलापूर येथून निघाल्यानंतर रस्त्यात तांदूळवाडी, इटकळ, अणदूर, जळकोट, आष्टामोड, येणेगुर, मुरुम मोड, विठ्ठलसाई साखर कारखाना, नाईक नगर, आनंदनगर व मुरुमच्या प्रतिभा निकेतन महाविद्यालयात त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. येणेगुर व मुरुम मोड येथे जेसीबीने गुलाबपुष्पांची उधळण करत पाटील यांचा सत्कार करण्यात आला. मुरुम शहरात उघड्या जीपमधून वाजत-गाजत त्यांची मिरवणूक काढण्यात आली.

जेवळी, अचलेर, आलुर, भोसगा, तुगांव, कोराळ, दाळींब, बेळंब, कोथळी, उमरगा आदी भागातील कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. भाजपच्या मूळ कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी बसवराज पाटील यांचा सत्कार केला, या कार्यकर्त्यांपेक्षा काँग्रेसमधील त्यांचे समर्थक कार्यकर्ते अधिक दिसत होते. त्यामुळे काँग्रेसचा हात सोडून गेलेल्या कार्यकर्त्यांच्या डोक्यावर कमळ चिन्ह असलेली टोपी आणि गळ्यातील भगवा दुपट्टा असे वेगळेच चित्र उमरगावासीयांना पाहायला मिळाले.

(Edited by Amol Sutar)

R

Basavraj Patil
Nashik BJP News : नागपूरला सवलती आणि दत्तक नाशिककडून होतेय वसुली!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com