Ajit Pawar On Waghya Dog Statue : रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी, अजितदादा म्हणतात, 'का जुने विषय...'

Demand to remove Waghya Dog Statue : .शिवाजी महाराजांकडे कोणतं कुत्रं होतं. त्याने त्यांच्या चितेमध्ये उडी टाकली. त्याचे स्मारक बांधले, अशी कोणतीही एका शब्दाची नोंदसुद्धा इतिहासामध्ये नसल्याचे इंद्रजित सावंत यांनी सांगितले.
Ajit Pawar On Waghya Dog Statue
Ajit Pawar On Waghya Dog Statue sarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar News : संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून रायगडावर असलेली वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी केली आहे. वाघ्या कुत्र्याला कुठलाही ऐतिहासिक पुरावा नाही त्यामुळे या समाधीला 100 वर्ष होण्याची आधी ती हटवण्यात यावी, असे देखील संभाजीराजेंनी म्हटले आहे. त्यांच्या मागणीनंतर वाघ्या कुत्र्याच्या समाधीकडे जाणारा रस्त्यावर लाकडी सुरक्षा कठडे उभारण्यात आले आहेत. तेथे पोलिस बंदोबस्त देखील आहे.

वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याच्या संभाजीराजेंच्या मागणी विषयी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, मला एक कळत नाही छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला सोडून 1680 ला गेले. 1630 त्यांचा जन्म 1680 ते गेले. हा सगळा काळ 80 ला गेल्यानंतर आता आपण २०२५ मध्ये आहोत. का असे जुने कुठले तरी मुद्दे काढले जातायेत.'

Ajit Pawar On Waghya Dog Statue
Shinde Vs Thackeray: मोठी बातमी ! एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे पहिल्यांदाच समोरा-समोर; नार्वेकरांच्या दालनात नेमके काय घडले...

इतिहासकार इंद्रजीत सावंत म्हणाले की, 'रायगडवारील वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवावा.शिवाजी महाराजांकडे कोणतं कुत्रं होतं. त्याने त्यांच्या चितेमध्ये उडी टाकली. त्याचे स्मारक बांधले, अशी कोणतीही एका शब्दाची नोंदसुद्धा इतिहासाच्या प्राथमिक आणि दुय्यम संदर्भ साधनांमध्ये नाही. या विषयाच्या ज्या कथा रचल्या कथा गेल्या त्या कथा दंतकथा आहेत.'

संभाजीराजे काय म्हणाले?

संभाजीराजे यांनी वाघ्य कुत्र्याच्या अस्तित्वाबाबत इतिहासामध्ये कुठलाही ऐतिहासिक पुरावा नसल्याचे म्हटले आहे. तसेच भारतीय पुरातत्व विभागाच्या धोरणानुसार 100 वर्षांहून अधिक पुरातन असलेली संरचना संरक्षित स्मारक म्हणून गणली जाते. त्यामुळे वाघ्या कुत्रा समाधी संरचनेस 100 वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच विहित कालमर्यादेत ही संरचना हटविणे अत्यावश्यक आहे.

Ajit Pawar On Waghya Dog Statue
Indrajit Sawant : प्रशांत कोरटकरच्या अटकेवर इंद्रजीत सावंतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले ‘अशा...’

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com