Ajit Pawar Plane Crash : बारामती विमानतळ असुरक्षितच; शून्य उपाययोजना : 10 वर्षांत 9 अपघात

Baramati Airport Safety : बारामती विमानतळावर गेल्या दहा वर्षांत नऊ अपघात झाले असून धावपट्टी नूतनीकरण, संरक्षक भिंत आणि दिशादर्शक यंत्रणांचा अभाव कायम आहे, त्यामुळे विमानतळाच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
A view of Baramati Airport runway, where multiple aircraft accidents have occurred over the past decade due to lack of renovation, safety infrastructure, and navigation systems, raising serious aviation safety concerns.
A view of Baramati Airport runway, where multiple aircraft accidents have occurred over the past decade due to lack of renovation, safety infrastructure, and navigation systems, raising serious aviation safety concerns.Sarkarnama
Published on
Updated on

Baramati Airport News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातामुळे बारामती येथील विमानतळ पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. येथील धावपट्टीचे काम सुमारे 15 वर्षांपूर्वी झाले. त्यानंतर आजतागायत नूतनीकरण झाले नाही. गेल्या 10 वर्षांत या विमानतळावर नऊ अपघात झाले. यात अनेकदा वैमानिक जखमी झाले आहेत. बारामती विमानतळाची धावपट्टी टेबल टॉप प्रकारची आहे. वैमानिकांना प्रशिक्षण देणाऱ्या विमानांची यावरून सर्वाधिक वाहतूक होते.

बारामती विमानतळाची धावपट्टी 1770 मीटर (5 हजार 807 फूट) लांबीची असून ती पूर्णपणे डांबरी (अस्फाल्ट) आहे. सुरक्षिततेच्या कोणत्याही उपाययोजना या विमानतळावर केल्याचे दिसून आले नाही. हे विमानतळ आधी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) ताब्यात होते, नंतर रिलायन्स एअरपोर्ट डेव्हलपर्स या कंपनीकडे व्यवस्थापन देण्यात आले.

मात्र त्या काळातही विमानतळावर आवश्यक त्या सुविधा नव्हत्या. जूनमध्ये स्वतः अजित पवार यांनीच बारामती विमानतळाचा विकास होण्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे (एमएडीसी) हस्तांतर करण्याचा निर्णय घेतला. 19 ऑगस्टला ‘एमएडीसी’कडे हस्तांतर करण्यात आले. मात्र विमानतळावर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कोणत्याही उपाययोजना केल्या गेल्या नाहीत. यामध्ये ना धावपट्टीचे नूतनीकरण झाले, ना साधी संरक्षक भिंत बांधण्यात आली.

दिशादर्शक यंत्रणाच नाही बारामती विमानतळावर कायमच अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे (व्हीआयपी) दौरे सुरू असतात. तरी देखील येथे साधी हवाई वाहतूक दिशादर्शक यंत्रणा (नेव्हिगेशनल एड्स) नाही. तसेच यंत्राधारित लॅंडिग यंत्रणा (आयएलएस- इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम) नाही.

A view of Baramati Airport runway, where multiple aircraft accidents have occurred over the past decade due to lack of renovation, safety infrastructure, and navigation systems, raising serious aviation safety concerns.
Ajit Pawar Plane Crash : मोठी बातमी! अजित पवारांच्या विमान अपघाताची सीआयडी चौकशी होणार, राज्य सरकारने दिले आदेश

मात्र किमान अतिउच्च वारंवारता सर्वदिशात्मक रेडिओ मार्गदर्शक (व्हीओआर- व्हीएचएफ ओम्नी डायरेक्शनल रेंज) अथवा जुन्या प्रकारचे साधन असलेले दिशाहीन रेडिओ संकेतस्थळ (एनडीबी- नॉन डायरेक्शनल बीकन) जे विमानाला दिशा ठरविण्यासाठी सिग्नल देते, अशी यंत्रणाही येथे उपलब्ध नाही. यापैकी एखादी जरी दिशादर्शक यंत्रणा उपलब्ध असती तर हा अपघात टळला असता, असे हवाई वाहतूक तज्ज्ञांनी सांगितले.

A view of Baramati Airport runway, where multiple aircraft accidents have occurred over the past decade due to lack of renovation, safety infrastructure, and navigation systems, raising serious aviation safety concerns.
Baramati Airplane Crash: बारामती विमान अपघातात अजितदादांसह आणखी एक हळहळणारी 'एक्झिट',राष्ट्रवादीच्या नेत्यानं मुलगी गमावली

बारामतीमधील अपघात

1) 28 जानेवारी 2026 : ‘लिअरजेट 45’ या विमानाचा अपघात, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू

2) 19 ऑक्टोबर 2023 : प्रशिक्षण विमान शेतात कोसळले

3) 22 ऑक्टोबर 2023 : रेडबर्ड ॲकॅडमीच्या विमानाचा अपघात, वैमानिक जखमी

4) 2017 आणि 2014 : तांत्रिक बिघाडामुळे विमान कोसळले

5) फेब्रुवारी 2019 : प्रशिक्षणादरम्यान विमानाचे इंजिन निकामी होऊन अपघात

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com