Guardian Minister Politics : रायगडला मिळणार लवकरच पालकमंत्री; शिवसेना-राष्ट्रवादीतील वाद मिटला? अजितदादांनीच दिले मोठे संकेत!

Raigad Minister Ajit Pawar NCP Vs Shivsena : भरत गोगावले हे पालकमंत्रिपद शिवसेनेला मिळावे हे जाहीरपणे सांगत आहे. रायगड जिल्ह्यात शिवसेनेच्या आमदारांची संख्या अधिक आहे त्यामुळे पालकमंत्रिपद शिवसेनेला मिळावे, असा त्यांचा दावा आहे.
Ajit Pawar| Eknath Shinde
Ajit Pawar| Eknath Shinde Sarkarnama
Published on
Updated on

Raigad Guardian Minister : रायगड पालकमंत्रिपदाच्या नियुक्तीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जानेवारी महिन्यात स्थगिती दिली होती. या स्थगितीला आता चार महिने होऊन गेले तरी पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला नसल्याचे चित्र होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भरत गोगावले यांच्यासाठी रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी आग्रही आहेत. तर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील आदिती तटकरेंसाठी रायगडच्या पालकमंत्रिपदावर दावा कायम ठेवला आहे.

पालमंत्रिपदासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी आग्रही असताना अजित पवारांनी मोठे विधान केले आहे. लवकरच रायगडला पालकमंत्री मिळेल, असे ते म्हणाले. या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील पालकमंत्रिपदावरील वाद मिटल्याची चर्चा आहे.

Ajit Pawar| Eknath Shinde
Beed Bandh Withdrawal : मोठी बातमी! बीड जिल्हा बंद स्थगित पण मराठा संघटना आंदोलनावर ठाम

'रायगडला पालकमंत्री लवकरच मिळेल तो मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. पण आम्ही कुठलीही गोष्ट थांबवून ठेवली नाही. पालकमंत्री नसताना देखील 31 मार्च संदर्भात निधी परत जायला नको, खर्च व्हायला पाहिजे या संदर्भात गोष्टी केल्या. आता नवीन वर्ष आहे त्यामुळे जिल्हा वार्षिक योजनेचे पैसे नेहमीपेक्षा जास्त सगळ्यांना देण्यात आले आहेत. रायगड जिल्ह्याला देखील लोकसंख्येच्या प्रमाणात देण्यात आले आहेत.' , असे अजित पवार म्हणाले.

कोणाला मिळणार संधी?

भरत गोगावले हे पालकमंत्रिपद शिवसेनेला मिळावे हे जाहीरपणे सांगत आहे. रायगड जिल्ह्यात शिवसेनेच्या आमदारांची संख्या अधिक आहे त्यामुळे पालकमंत्रिपद शिवसेनेला मिळावे, असा त्यांचा दावा आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून आदिती तटकरे यांना पालकमंत्रिपद मिळावे यासाठी आग्रह धरला जातो आहे. 1 मे रोजी अदिती तटकरे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहन करण्यात आले. त्यामुळे पालकमंत्रिपदावर तटकरे यांचा दावा अधिक मजबूत झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे पालकमंत्रिपदावर गोगावले की तटकरे यापैकी कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे.

नाशिकच्या पालकमंत्रिपद महाजनांकडे?

रायगडसोबत नाशिकच्या देखील पालकमंत्रिपदाचा तिढा आहे. नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी गिरीश महाजन यांचे नाव भाजपकडून आघाडीवर आहे तर शिवसेनेकडून दादा भुसे यांच्या नावासाठी आग्रह होता. मात्र, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांनाच पाकमंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. कुंभमेळ्याच्या संदर्भात महाजन यांनी बैठका घेत तयारीला देखील सुरुवात केली आहे. त्यामुळे महाजन यांच्या नावाची घोषणा ही केवळ आता औपचारिकता असल्याची चर्चा आहे.

Ajit Pawar| Eknath Shinde
Jayant Patil Vs Samrat Mahadik : जयंत पाटलांविरोधात भाजपची कुटनिती? शह देण्यासाठीच सम्राट महाडिकांना बळ

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com