Ajit Pawar Video : मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून अजितदादांची फटकेबाजी; म्हणाले, 'एकनाथ शिंदे आणि मी...'

Ajit Pawar Marathi Sahitya Sammelan : अजित पवार म्हणाले, 'एकनाथ शिंदे आणि मी एका व्यासपीठावर असलो की आमच्यावर क्लोज कॅमेरे असतात. आमच्या देहबोलीवर लक्ष असतं.
Ajit Pawar
Ajit Pawarsarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar News : दिल्ली होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघे व्यासपीठावर होते. संमेलनाच्या समारोप प्रसंगी अजित पवारांनी जोरदार टोलेबाजी केली.

अजित पवार म्हणाले, 'एकनाथ शिंदे आणि मी एका व्यासपीठावर असलो की आमच्यावर क्लोज कॅमेरे असतात. आमच्या देहबोलीवर लक्ष असतं. ते बघत असतं आमच्या चेहऱ्यावर हास्य आहे का ते. मी माझ्या मनाला सांगत असतो की बाबा चेहरा प्रसन्न दिसला पाहिजे. अन्यथा दुसरी कुठली बातमी व्हायला नको. त्यामुळे आमच्यात कुठलीही नाराजी नाही.'

एकनाथ शिंदें यांनी दोन दिवसांपूर्वी एक वक्तव्य केले होते त्यावरून त्यांची फिरकी घेतली. 'मला हलक्यात घेऊ नका, असा शब्द एकनाथ शिंदेंनी परवा वापरला पण कोणाला घ्यायची नाही मशालीला की आणखी कोणाला.' असे म्हणताना अजित पवारांना आपले हसू आवरता आले नाही.

Ajit Pawar
Shivsena-BJP Cold War : शिवसेना-भाजपमध्ये अखेर जुंपलीच; फडणवीसांच्या निकटवर्तीयास शिंदेंचा मंत्री देणार टशन

उदय सामंत जिथे जातो...

पहिल्यांदा संधी मी दिली होती. पण कुठं गाडी फिस्कटली मला सोडून उद्धवजींकडे गेला. तिथं काही काळ राहिला पुन्हा एकनाथरावांकडे गेला. पण उदयचे एक आहे जिथे जातो तिथे निष्ठेने राहतो. कुठेही त्याच्यात बदल होत नाही. तो मागचं सगळं विसरून जातो. ज्याचा तो होतो त्यांचं इमानेइतबारे काम करतो.

संमेलनध्यक्षांचे कौतुक

अजित पवार म्हणाले की, मी संमेलनाध्यक्ष तारा भवळकर यांचे भाषण समाज माध्यमांवर ऐकले. ते भाषण ऐकायला आपण प्रत्यक्षात असलो पाहिजे होतो, असे मला वाटले. दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदन हे राजकीय नेत्यांसाठी आहे. मात्र दिल्लीतील मराठी माणसांना भेटण्यासाठी सभागृह असले पाहिजे. महाराष्ट्राला शोभेल आणि सगळ्यांना अभिमान वाटेल अशी वास्तु आपण दिल्लीत उभारू, असे देखील पवार म्हणाले.

Ajit Pawar
Santosh Deshmukh : संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीना पळून जाण्यास कोणी मदत केली? सुरेश धसांनी उघड केले धाराशिव कनेक्शन

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com