Santosh Deshmukh : संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीना पळून जाण्यास कोणी मदत केली? सुरेश धसांनी उघड केले धाराशिव कनेक्शन

Suresh Dhas News : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीना पळून जाण्यास कोण मदत केली हे स्पष्ट करीत सुरेश धस यांनी या खून प्रकरणातील धाराशिव कनेक्शनच उघड केले आहे.
santosh deshmukh, suresh dhas
santosh deshmukh, suresh dhas Sarakarnama
Published on
Updated on

Beed News : केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली. त्यांनतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेला जवळपास अडीच महिने उलटले आहेत. त्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी अटकेत असलेल्या वाल्मिक कराडसह आठ जणांना मोक्का लावला आहे. अद्याप या प्रकरणातील एक आरोपी फरार आहे. त्याचा शोध घेतला जात असतानाच आता या प्रकरणात सुरेश धस यांनी केलेल्या आरोपामुळे मोठा ट्विस्ट आला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीना पळून जाण्यास कोण मदत केली हे स्पष्ट करीत सुरेश धस यांनी या खून प्रकरणातील धाराशिव कनेक्शनच उघड केले आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सत्ताधारी व विरोधकांकडून अनेक आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. दररोज केल्या जात असलेल्या आरोपामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक झाली आहे. त्यानंतर आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली जात आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील, भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांच्या प्रमाणे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे सरकारकडे वेगवेगळ्या मागण्या केल्या आहेत. त्यातच रविवारी एका कार्यक्रमानिमित्त धाराशिव जिल्ह्यात असलेल्या भाजप आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख खून प्रकरणातील धाराशिव कनेक्शन उघड केले.

santosh deshmukh, suresh dhas
Shivsena UBT : इच्छुकांवर गुन्हा दाखल आहे का? पुणे महापालिकेसाठी ठाकरे गटाची 'फिल्डिंग'; भविष्यातील धोका टाळण्यासाठी घेतली मोठी खबरदारी...

संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना पळून जाण्यासाठी धाराशिवमधील वाशीच्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मदत केली. नितीन बिक्कड यातील एक आरोपी आहे. या सर्वांची चौकशी होऊन स्वतंत्र मकोका लावावा किंवा सहआरोपी करावे, अशी मागणी धस यांनी केली.

santosh deshmukh, suresh dhas
Shivsena : "हे सगळे गए गुजरे लोकं" निलम गोऱ्हेंच्या आरोपांना ठाकरेंचं प्रत्युत्तर

या प्रकरणातील तपास अधिकारी सांगतात आरोपी जंगलातून पळून गेले. परंतु आरोपी जंगलातून पळून गेले नाहीत. ते वाशी शहरातून गेले आहेत. वाशी पोलीस ठाण्यामधील काही अधिकारी कर्मचाऱ्यांनी या आरोपींना फरार होण्यासाठी मदत केली, असा आरोप आमदार धस यांनी केला आहे.

santosh deshmukh, suresh dhas
Teacher Sanction Issues: नवीन शिक्षक संचमान्यता विद्यार्थ्यांच्या मुळावर; प्राथमिक शिक्षक संघ उचलणारं मोठं पाऊल, सरकारचीही होणार अडचण

जरांगे यांच्या नाराजीवर बोलण्यास नकार

मनोज जरांगे (Manoj Jaranage) यांच्या नाराजीवर बोलण्यास सुरेश धस यांनी नकार दिला. ते म्हणाले, मनोज जरांगे माझे दैवत आहेत. त्यांच्यावर मी काहीही बोलणार नाही. कोल्हापूर येथे होणारे मराठा समाजाचे अधिवेशन हे जिल्हा पुरते आहे. त्यामुळे त्या अधिवेशातून मनोज जरांगे यांना डावलेले, असा त्याचा अर्थ कोण काढू नये, असे आमदार सुरेश धस यांनी म्हटले आहे.

santosh deshmukh, suresh dhas
Suresh Dhas : सुरेश धस यांचा वेगळाच प्लॅन, भरसभेत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 'या' नेत्याचे तोंडभरून कौतुक

धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्या भेटीवर मनोज जरांगे यांनी टीका केली होती. मनोज जरांगे म्हणाले होते की, तो माणूस कोमात गेला होता. त्यामुळे त्यांना शेवटचे बघणे गरजेचे होते ना? त्यांचा तो परिवार आहे आणि ती पारिवारिक भेट होती, असा टोला आमदार सुरेश धस यांना जरांगे पाटील यांनी लगावला होता. परंतु त्यावर बोलण्यास धस यांनी नकार दिला.

santosh deshmukh, suresh dhas
Mahayuti News : शिंदेंच्या मंत्र्यांची मुख्यमंत्र्याकडे तक्रार; अजितदादांच्या शिलेदाराला मोठा दणका

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com