Ajit Pawar News : अवैध मुरूम उत्खनन होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर माढा तालुक्यातील कुर्डू येथे कारवाईसाठी गेलेल्या आयपीएस अधिकारी अंजली कृष्णन यांच्याशी तेथील ग्रामस्थ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसोबत वाद झाला. त्यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना यांना फोन केला. अजित पवारांनी व्हिडिओ काॅलवर अंजली कृष्णन यांच्याशी बातचीत केली. ती व्हायरल झाली आहे. अजित पवार हे महिला आयपीएस अधिकाऱ्याला धमकावत असल्याची टीका करण्यात येत आहे.
अजित पवार हे फोनवर म्हणाले की, 'हे थांबवा आणि तहसीलदारांना जाऊन सांगा उपमुख्यमंत्र्यांचा फोन आला होता. मुंबईतील वातावरण बिघडले आहे आपल्याला त्याला प्राधान्य द्यायचे आहे. आयपीएस कृष्णन यांनी थेट आपल्या फोनवर फोन करा, असे सांगितले असता अजित पवार म्हणाले, मी तुझ्यावर थेट अॅक्शन घेऊ शकतो. तु्झा नंबर दे मी तुझ्या फोनवर व्हाॅट्सकाॅल करतो. माझ्या चेहरा तरी ओळखू येईल ना. येवढं डेरिंग झालं.'
मिळालेल्या माहितीनुसार, कुई (ता. माढा) दूध उत्पादकाचे गाव. सर्वात जास्त शेतकऱ्यांचा जोडधंदा दुग्ध व्यवसाय असून, गावाकडे येणारे सर्व पाणंद रस्ते पावसाने खराब झाले असून, दुरुस्तीसाठी शिदवडकर-कापरे वस्तीवरील पाझर तलावातील मुरूम उचलून खड्डे पडलेल्या रोडवर टाकण्याचे काम ग्रामपंचायतच्या माध्यमातून चालू होते.
या कामांची वर्क ऑर्डरही झाली आहे. मात्र अवैध मरुमाचा उपसा सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाल्याने कारवाई करण्यासाठी करमाळा पोलिस उपविभागीय अधिकारी कृष्णन दोन तलाठ्यांसह पोचल्या. तेव्हा मुरूम उचलण्याचे काम चालू होते. त्यांना थांबवायला सांगितले व कारवाई करण्यासाठी महसूल प्रशासनाचे प्रांताधिकारी व तहसीलदार यांना फोन करून बोलावून घेतले. मात्र कारवाई चुकीची असल्याचे माजी सरपंच अण्णा ढाणे यांनी सांगितले. यावेळी वाद होऊन तणाव निर्माण झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माढा-करमाळा विधानसभा अध्यक्ष बाबासाहेब जगताप यांनी थेट अजित पवारांना फोन लावून अंजली कृष्णन यांच्याकडे दिला. यावेळी त्यांची आणि अजित पवारांमध्ये झालेली बातचीत व्हायरल झाली आहे.
अंजली दमानिय यांनी देखील अजित पवारांच्या संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अजित पवारांवर टीका केली आहे. अजित पवार हे एका उच्चशिक्षित महिला आयपीएस अधिकाऱ्याला धमकावत आहेत. जर त्या आयपीएस अधिकाऱ्यावर कारवाई झाली अथवा बदली झाली तर आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा दमानिया यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.