Ajit Pawar Video: महिला IPS अधिकाऱ्यावर 'दादा'गिरीचा व्हिडिओ व्हायरल होताच पवारांची सारवासारव; म्हणाले, कायद्याच राज्य...

Ajit Pawar Video: अवैध मुरूम उत्खनन होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर माढा तालुक्यातील कुर्डू येथे कारवाईसाठी गेलेल्या आयपीएस अधिकारी अंजली कृष्णन यांच्याशी अजित पवारांनी फोनवरुन दादागिरीची भाषा केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Ajit Pawar Scolded on IPS Officer
Ajit Pawar Scolded on IPS Officer
Published on
Updated on

Ajit Pawar Video: अवैध मुरूम उत्खनन होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर माढा तालुक्यातील कुर्डू येथे कारवाईसाठी गेलेल्या आयपीएस अधिकारी अंजली कृष्णन यांच्याशी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी फोनवरुन दादागिरीची भाषा केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अजित पवारांवर मोठ्या प्रमाणावर टीका टिप्पण्या सुरु झाल्या. या प्रकरणाची खूपच चर्चा वाढल्यानंतर अखेर पवारांनी यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. थेट ट्विट करुन त्यांनी आपली भूमिका मांडली आहे.

Ajit Pawar Scolded on IPS Officer
Apurv Hire: माजी आमदार अपूर्व हिरे दाम्पत्याच्या अडचणी वाढल्या! 85 कोटींच्या वसुलीसाठी नोटीस

व्हिडिओत काय दिसलं?

अवैध मुरूम उत्खननात हस्तक्षेप करणाऱ्या आयपीएस अधिकारी अंजली कृष्णन यांच्याशी स्थानिक ग्रामस्थ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसोबत वाद झाला. यानंतर या कार्यकर्त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन लावला. अजित पवार फोनवर म्हणाले, "हे थांबवा आणि तहसीलदारांना जाऊन सांगा उपमुख्यमंत्र्यांचा फोन आला होता. मुंबईतील वातावरण बिघडलं आहे आपल्याला त्याला प्राधान्य द्यायचं आहे. यानंतर अजित पवारच बोलत आहेत की दुसरं कोणी आवाज बदलून बोलतंय याची खातरजमा करण्यासाठी आयपीएस कृष्णन यांनी पवारांना आपल्या फोनवर फोन करा, असं त्यांना सांगतलं. त्यानंतर अजित पवार भडकले आणि म्हणाले की, मी तुझ्यावर थेट अॅक्शन घेऊ शकतो. तु्झा नंबर दे मी तुझ्या फोनवर व्हॉट्सअप कॉल करतो. माझ्या चेहरा तरी ओळखू येईल ना? येवढं डेरिंग झालं"

अजित पवारांवर टीका

फोनवरुन महिला आयपीएस अधिकारी अंजली कृष्णन आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील हा संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. त्यानंतर अजित पवारांवर मोठ्या प्रमाणावर टीका व्हायरला सुरुवात झाली. राज्याच्या उपमुख्यंमत्रीपदी असलेल्या व्यक्तीनं अशी दादागिरीची भाषा वापरणं चुकीचं असल्याचं अनेकांनी म्हटलं. तसंच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील पवारांवर टीका केली. अजित पवार हे एका उच्चशिक्षित महिला आयपीएस अधिकाऱ्याला धमकावत आहेत. जर त्या आयपीएस अधिकाऱ्यावर कारवाई झाली अथवा बदली झाली तर आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा दमानिया यांनी दिला.

अजित पवारांची सारवासारव

दरम्यान, मोठ्या प्रमाणावर टीका होऊ लागल्यानं अजित पवार यांनी यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी ट्विटरवर एक पोस्ट केली. यात म्हटलं की, "सोलापूर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या संवादाच्या संदर्भात काही व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहेत. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत रहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता. आपल्या पोलीस दलाबद्दल तसंच धैर्यानं आणि प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे. माझ्यासाठी कायद्याचं राज्य हेच सर्वात महत्त्वाचं आहे. मी पारदर्शक प्रशासकीय कारभारासाठी आणि बेकायदेशीर वाळू, माती, खडक उपशासह प्रत्येक बेकायदेशीर कृतीवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहे"

नेमकं विषय काय?

दूध उत्पादकांचं गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या कुई (ता. माढा) गावात हा प्रकार घडला. या गावात सर्वाधिक शेतकरी जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय करतात. या गावाकडं येणारे सर्व पाणंद रस्ते पावसानं खराब झालेले आहेत, त्यामुळं त्याच्या दुरुस्तीसाठी शिदवडकर-कापरे वस्तीच्या पाझर तलावातील मुरूम उचलून खड्डे पडलेल्या रोडवर टाकण्याचं काम ग्रामपंचायतीकडून सुरु होतं. या कामांची वर्क ऑर्डरही झाली आहे. मात्र, अवैध मुरुमाचा उपसा सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाल्यानं कारवाई करण्यासाठी करमाळा पोलिस उपविभागीय अधिकारी कृष्णन दोन तलाठ्यांसह घटनास्थळी पोचल्या.

तेव्हा मुरूम उचलण्याचं काम सुरु होतं, हे काम त्यांनी तात्काळ थांबवायला सांगितलं तसंच महसूल प्रशासनाचे प्रांताधिकारी व तहसीलदार यांना फोन करून बोलावून घेतलं आणि कारवाई करण्यास सांगितलं. पण ही कारवाई चुकीची असल्याचं माजी सरपंच अण्णा ढाणे हे यावेळी कृष्णन यांना सांगत होते. पण अधिकारी कारवाईवर ठाम असल्यानं यावेळी वाद होऊन तणाव निर्माण झाला. बिघडलेली परिस्थिती पाहून राष्ट्रवादी काँग्रेसचे माढा-करमाळा विधानसभा अध्यक्ष बाबासाहेब जगताप यांनी थेट अजित पवारांना फोन लावला आणि पोलीस अधिकारी अंजली कृष्णन यांच्याकडं दिला. यावेळी त्यांची आणि अजित पवारांमध्ये झालेली बातचीत व्हायरल झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com