Apurv Hire: माजी आमदार अपूर्व हिरे दाम्पत्याच्या अडचणी वाढल्या! 85 कोटींच्या वसुलीसाठी नोटीस

Apurv Hire: माजी आमदार अपूर्व हिरे दांपत्य अध्यक्ष असलेल्या दोन्ही बँकांमध्ये संशयास्पद कर्ज वाटपाचा आरोप
Apurv Hire
Yogita and Apurv Hireesakal
Published on
Updated on

Dr Apurv Hire News: शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उपनेते अद्वय हिरे यांचा मंत्री दादा भुसे यांच्याशी राजकीय संघर्ष टोकाला पोहोचलाय. त्याची झळ आता बंधू माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे यांनाही बसली आहे. त्यामुळे हिरे कुटुंबीयांचे राजकारण दिवसेंदिवस अडचणचे बनले आहे.

Apurv Hire
Pratap Sarnaik Tesla Car : 61 लाखांच्या कारमधून मंत्री प्रताप सरनाईकांचा नातू जाणार शाळेत, देशातील पहिली 'टेस्ला' केली खरेदी!

शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर विविध आरोप करणाऱ्या शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उपनेते अद्वय हिरे यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा आहे. मालेगाव बाह्य मतदार संघात अद्वय हिरे यांनी शिक्षण मंत्री भुसे यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती. त्या प्रचारात दोघांनीही एकमेकांवर गंभीर आरोप करत राजकीय आव्हान दिले होते. त्याचा राजकीय फटका अद्वय हिरे यांना सातत्याने बसत आहे. आता शासकीय यंत्रणेने माजी आमदार अपूर्व हिरे आणि त्यांच्या पत्नी योगिता हिरे यांना टार्गेट केले आहे. जिल्हा उपनिबंधक फय्याज मुलानी यांनी या दोन्ही नेत्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या बँकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

Apurv Hire
Bjp News : एकनाथ शिंदेंना बाजुला सारून भाजपचा स्वबळाचा फॉर्म्युला? अमित साटम लागले कामाला, रणनीती ठरली!

माजी आमदार अपूर्व हिरे अध्यक्ष असलेल्या मालेगावच्या व्यंकटेश नागरी सहकारी बँकेत पुन्हा दाखल करण्यात आला आहे. लेखापरीक्षक एसटी गांगुर्डे यांच्या अहवालानुसार 489 कर्ज खात्यांवर 30.1 कोटी रुपये कर्जपुरवठा झाला. मातृत्व पूर्णतः थकीत आहे. थकबाकीचे हे प्रमाण 72 टक्के आहे. यातील बहुतांशी कर्जदार हिरे यांच्या नियंत्रणाखालील महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या कर्मचाऱ्यांचे आहे. आयफोन या नुकसानीची जबाबदारी अधिकारी आणि बँकेच्या संचालकांवर निश्चित करण्यासाठी जितेंद्र शेळके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Apurv Hire
Panvel politics : नवी प्रभागरचना सत्ताधाऱ्यांच्या फायद्याची; भाजपच्या नगरसेवकांचे प्रभाग सुरक्षित पण विरोधकांमध्ये चिंतेचं वातावरण

योगिता अपूर्व हिरे अध्यक्ष असलेल्या नाशिक जिल्हा महिला विकास सहकारी बँकेतही असाच घोटाळा झाला आहे. लेखापरीक्षक अविनाश पाटील यांनी त्याबाबतचा अहवाल सादर केला आहे. त्यानुसार बँकेचे एनपीए ४५.८३ टक्के आहे. या संस्थेतही हिरे यांच्या नियंत्रणाखाली आदिवासी सेवा समिती शिक्षण संस्थेच्या कर्मचाऱ्यांना केलेला २.४६ कोटींचा कर्जपुरवठा वसूल होऊ शकला नाही. बँकेने ७८० खात्यांवर २१.४७ कोटींचा कर्ज पुरवठा केला. मात्र तो वसूल होऊ शकलेला नाही. त्यामुळे बँकेचे नुकसान झाले असून त्याची जबाबदारी निश्चित करण्यासाठी तालुका उपनिबंधक संजय गीते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Apurv Hire
Shiv Sena Leader Missing : महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ ! शिवसेनेचा नेता अचानक बेपत्ता..शेवटचं ठिकाण CCTV मध्ये कैद

सहकार निबंधकांनी केलेल्या या कारवाईने माजी आमदार अपूर्व हिरे आणि त्यांच्या पत्नी योगिता हिरे या अडचणीत आल्या आहेत. यासंदर्भात सहकार कलम 88 अन्वये कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे हिरे यांच्या नियंत्रणाखाली विविध सहकारी संस्थांच्या कामकाजाबाबत मोठे गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यानिमित्ताने यांचे राजकीय विरोधक शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याशी त्याचा संबंध जोडला जात आहे. जिल्हा उपनिबंधकांच्या या कारवाईने जिल्हाभरातील राजकीय नेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com