Shiva Mohad : शिवा मोहोड शिवबंधनात !; मिटकरी विरुद्ध मोहोड 'सामना' रंगणार

Amol Mitkari : राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेत बेछूट आरोप करणारे शिवा मोहोड यांनी आज शिवसेना (उबाठा) मध्ये प्रवेश केला आहे. भविष्यात मिटकरी विरोधात मोहोड हा 'सामना' रंगण्याची चिन्हं आहे.
Shiva Mohad Join Shiv Sena (UBT)
Shiva Mohad Join Shiv Sena (UBT)Sarkarnama

योगेश फरपट

Akola Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला वेग आला असताना अचानक अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. आमदार अमोल मिटकरी यांच्या दबावाला कंटाळून शहर आणि ग्रामीणमध्ये आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणारे व आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर कमी वयात अनेक राजकीय पदे भूषविणारे शिवा मोहोड यांनी अखेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. अकोट विधानसभा मतदारसंघासाठी शिवा मोहोड इच्छुक असून, तिथे त्यांनी कामदेखील सुरू केले आहे.

सोमवारी 22 एप्रिल रोजी अमरावती येथील एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्यांनी शिवबंधन बांधले. दरम्यान, त्यांनी आमदार अमोल मिटकरी यांच्यावर गंभीर आरोपसुद्धा केले आहेत. मिटकरींना असेच पाठीशी घातले तर अनेक जण रामराम ठोकतील, असा इशाराही दिला आहे. आमदार अमोल मिटकरी यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीत बंडाचे निशाण शिवा मोहोड यांनी फडकावले होते. त्यानंतर मिटकरींच्या विषयीचे अनेक गौप्यस्फोट ते करणार होते. भविष्यात मोहोड आणि मिटकरी यांचा सामना जिल्ह्यात आणि राज्यात रंगण्याची चिन्हं आहेत. (राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Shiva Mohad Join Shiv Sena (UBT)
Lok Sabha Election News : सुरतमध्ये नवा ट्विस्ट; निवडणूक स्थगित करण्याची काँग्रेसकडून आयोगाकडे मागणी

जिल्ह्यात जवळपास सर्वच पक्षात राजकीय धुसफूस सुरू आहे. कोण कोणत्या पक्षात जाईल काही सांगता येत नाही. त्याचा परिणाम निश्चितच अकोला लोकसभा निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे. भाजप, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडीसह इतर पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्तेही काहींना काही कारणाने पक्ष सोडून दुसरीकडे स्थंलातरित होताना दिसत आहेत. जिल्ह्यात सहकारी लॉबी स्ट्राँग असून, एकेकाळी जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांचा दबदबा होता. आज मात्र तो नाहीसा झालेला दिसतो. शिवाय अंतर्गत गटबाजीही मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचे दिसते.

राष्ट्रवादी काँग्रेसपासून आपल्या राजकारणाची आणि शिवसंग्रामपासून समाजकारणाची सुरुवात करणारे शिवा मोहोड यांनी मोठे जनमत निर्माण केले. केवळ अकोला शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातही त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारा मोठा युवक वर्ग आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पद यशस्वीरीत्या सांभाळून महानगरपालिकेत नगरसेवक, सभापती, सभागृह नेता पदाची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे सांभाळली. शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही कानशिवणी जिल्हा परिषद निवडणुकीत घवघवीत यश संपादन करून त्यांनी आपले ग्रामीण भागातील वर्चस्व सिद्ध केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे विभाजन झाल्यानंतर शिवा मोहोड अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी झाले. परंतु तेथे त्यांच्या आजपर्यंतच्या कार्याची योग्य दखल आमदाराच्या दबावामुळे घेतल्या गेली नाही. शिवाय ज्यांच्यात कोणतीही निवडणूक लढविण्याची किंवा निवडून येण्याची क्षमता नाही अशा लोकप्रतिनिधींमुळे त्यांना अनेक खोट्या आरोपांना आणि अडचणींना सामोरे जावे लागले. विकास निधीमध्ये अडथळे येऊ लागले, असे सांगून त्यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती.

त्यानंतर ते कोणत्या पक्षात जातात याकडे लक्ष लागले होते. अखेर सोमवारी त्यांनी अमरावती येथील एका जाहीर कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत खा. अरविंद सावंत, जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश शिरवाडकर यांच्या मार्गदर्शनात तसेच आ. नितीन देशमुख व जिल्हा प्रमुख गोपाल दातकर, शहर प्रमुख राहुल कराळे यांच्या नेतृत्वात शिवसेना उबाठा पक्षात प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशामुळे आता शहरी व ग्रामीण भागात शिवसेना उबाठा पक्षाची ताकद आणखी वाढणार असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

शिवसेना ‘उबाठा’ची ताकद वाढणार

बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आहेत. सध्या या गटात जिल्हा परिषद सदस्य गोपाल दातकर हेही आहेत. दोन्ही नेते पॉवरफुल असून, पक्षवाढीच्या दृष्टीने त्यांचे चांगले प्रयत्न सुरू आहेत. त्यात युवा नेते शिवा मोहोड यांची साथ आता लाभणार आहे. पक्षसंघटनाच्या दृष्टीने ही महत्त्वाची राजकीय घडामोडी समजली जात आहे. लोकसभा निवडणूकीच्या दृष्टीने शिवा मोहोड यांची मदत महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अभय पाटील यांना होऊ शकते. शिवाय मोहोड यांच्या रूपात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला चांगला नेता मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

R

Shiva Mohad Join Shiv Sena (UBT)
Bachchu Kadu : बच्चू कडू कडाडले 'त्याचे परिणाम चांगले होणार नाही....'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com