Akola Municipal Election: भाजप-MIMची तुटलेली युती; आता तिथेच मतदानाआधी शिंदेंच्या शिवसेनेची मोठी खेळी; सत्तेची समीकरणं फिरली; गुलाल कोण उधळणार?

Eknath Shinde News : महापालिका मतदानाला काही तासाचा अवधी असताना शिंदेंच्या शिवसेनेचा मोठा डाव टाकला असून सत्तेची समीकरणं फिरली असल्याने आता गुलाल कोण उधळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Ekanath Shinde Shiv sena
Ekanath Shinde Shiv senaSarkarnama
Published on
Updated on

Akola News : नगरपालिका निवडणुकीनंतर अकोला जिल्हा चांगलाच चर्चेत आला आहे. येथील अकोट नगरपालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपने थेट एमआयएमशी युती केली. अकोट विकास मंचची स्थापना करत भाजपने थेट एमआयएमला सोबत घेतले होते. त्यामुळे त्याची चर्चा देशभर झाली. तर दुसरीकडे आता अकोला महापालिकेत मोठ्या घडामोडी घडत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने प्रकाश आंबेडकर यांच्याकडे मदत मागितली असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे मतदानाला काही तासाचा अवधी असताना शिंदेंच्या शिवसेनेचा मोठा डाव टाकला असून सत्तेची समीकरणं फिरली असल्याने आता गुलाल कोण उधळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अकोला महापालिकेसाठी गुरुवारी मतदान होत आहे. त्यापूर्वीच मोठ्या घडामोडी घडत आहेत. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले असून अकोल्यात वंचितचे उमेदवार नसलेल्या जागांवर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने वंचितकडे मदतीचा हात मागितला आहे. वंचितची मते शिंदेसेनेच्या बाजूने वळवण्याची विनंती केली आहे. त्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री संजय राठोड वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा करत आहेत. शहरबाहेरील अज्ञात ठिकाणी आंबेडकर आणि राठोड यांच्यात बैठक झाल्याची चर्चा आहे.

Ekanath Shinde Shiv sena
Shivsena Vs BJP : भाजप-शिंदेंच्या शिवसेनेत तुफान राडा, चार जखमी; उमेदवाराच्या अटकेनंतर वातावरण तापले; रुग्णालयात गोंधळ

अकोला महापालिकेच्या निवडणुकीत शिंदेसेना 80 पैकी 72 जागांवर लढत आहे. तर वंचित 54 जागा लढवत आहे. मतदान अवघ्या काही तासांवर आलेले असताना शिंदेसेनेने मोठा डाव टाकला आहे. शिंदेसेनेने थेट वंचितकडे मदतीची मागणी केली आहे. वंचित लढवत नसलेल्या जागांवर आम्हाला मदत करा, अशी मागणी शिंदेसेनेकडून करण्यात आली आहे.

Ekanath Shinde Shiv sena
Shivsena UBT Politics: वसंत गिते यांचे अस्तित्व पणाला, भाजपसह स्वपक्षीयांनीही घेरल्याने महापालिकेसाठी एकहाती लढत!

शिवसेनेचे मंत्री संजय राठोडांनी (Sanjay Rathod) प्रकाश आंबेडकरांसोबत चर्चा सुरु असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. केंद्रीय राज्यमंत्री आणि शिंदेसेनेचे नेते प्रतापराव जाधवदेखील अकोल्यात पक्षासाठी किल्ला लढवत आहेत. शिंदेसेना-वंचित यांच्यातील पाठिंब्याचा विषय मार्गी लागल्यास निवडणूक निकालावर त्याचे परिणाम दिसू शकतात.

Ekanath Shinde Shiv sena
Latur NCP : नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर विजय खेचून आणला, पण नियतीनं तो आनंद काही दिवसांतच हिरावला

अकोला हा आंबेडकरांचा बालेकिल्ला मानला जातो. याठिकाणाहून ते एकवेळा लोकसभेवर निवडून गेले होते. लोकसभा निवडणुकांमध्ये अकोल्यात आंबेडकरांना लक्षणीय मतदान होते. अकोल्यात 2017 मध्ये महापालिकेची अखेरची निवडणूक झाली. त्यात भाजपने 80 पैकी 48 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले. त्याआधी 2012 मध्ये भाजपला येथे केवळ 18 जागा मिळाल्या होत्या. 2017 मध्ये अकोल्यात काँग्रेसने 13, शिवसेनेने 8, राष्ट्रवादी काँग्रेसने 5, भारिपने 3, एमआयएमने 1 आणि अपक्षांनी 2 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे उद्या होत असलेल्या मतदानाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिंदेसेनेने थेट वंचितकडे मदतीची मागणी केली आहे. त्यामुळे यावर आता वंचित काय निर्णय घेणार यावर बरेच काही अवलंबुन आहे, त्यामुळे शिंदे सेनेने केलेल्या मागणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Ekanath Shinde Shiv sena
Nanded Congress: नांदेडमध्ये काँग्रेस उमेदवाराच्या पतीवर मध्यरात्री तलवारीने हल्ला

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com