BJP–AIMIM Alliance : महाराष्ट्राच्या राजकारणाला धक्कादायक वळण, सत्तेसाठी भाजपची ओवेसींच्या एमआयएमसोबत युती

Akot Nagar Panchayat BJP–AIMIM : सत्तेसाठी भाजपने एमआयएमसोबत घरोबा केला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात प्रथम एमआयएम आणि भाजप एकत्र आल्याचे सांगितले जात आहे.
AIMIM vs BJP Lok Sabha
AIMIM BJP Sarkarnama
Published on
Updated on

BJP Politics : भाजप सत्ता मिळवण्यासाठी काहीही करू शकते, अशी टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. मात्र या टीकेत तथ्य असल्याचा प्रत्यत अकोला जिल्ह्यात आहे. नुकताच नगपपंचायत आणि नगपालिका निवडणूक झाली. अकोट नगरपालिकेत भाजपला बहुमत मिळाले नाही. मात्र, सत्तेत येण्यासाठी त्यांनी चक्क असुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमसोबत युती केली आहे.

भाजपच्या नेतृत्वात अकोट विकास मंच स्थापन करण्यात आला आहे. भाजपने अकोट नगरपंचायतीमध्ये सर्वाधिक 11 जागा जिंकल्या मात्र, 35 जागा असलेल्या नगरपंचायतीमध्ये त्यांना स्वबळावर सत्ता मिळाली नाही. त्यामुळे विरोधी पक्षात सर्वाधिक पाच जागा जिंकलेल्या एमआयएमला अकोट विकास मंचात घेत सत्तेवर दावा सांगितला.

विशेष म्हणजे या आघाडीत ठाकरेंची शिवसेना, शिंदेंची शिवसेना. अजित पवारांची राष्ट्रवादी आणि बच्चू कडूंच्या प्रहारचा देखील समावेश आहे. या आघाडीची नोंदणी अकोला जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. त्यामुळे आघाडीतील सर्व पक्षांना भाजपचा व्हिपचे पालन करावे लागणार आहे.

AIMIM vs BJP Lok Sabha
Vilasrao Deshmukh : विलासराव देशमुखांच्या आठवणीत रितेश देशमुख भावुक, शेअर केले 'UNSEEN' फोटो

भाजपचे आमदार रवी ठाकूर हे या आघाडीचे गटनेते असणार आहे. 13 जानेवारीला उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत सदस्यांच्या निवडीत ही आघाडी एकत्रित मतदान करणार आहे. माया धुळे या नगराध्यक्ष असून नगपालिकेत विरोधी पक्षात काँग्रेस सहा सदस्य आणि वंचितचे दोन सदस्य असणार आहे.

दोन जागा रिक्त

अकोट नगरपंचायतीमध्ये 35 जागा आहेत. त्यातील दोन जागा रिक्त असून 33 जागांवर निवडणूक झाली. त्यामध्ये भाजपला सर्वाधिक 11, काँग्रेसला 5, एमआयएम 5, शिंदेंची शिवसेना 1, ठाकरेंची शिवसेना 2, अजित पवारांची राष्ट्रवादी 2, शरद पवारांची राष्ट्रवादी दोन आणि प्रहारचे तीन सदस्य आहे. नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या माया धुळे या विजयी झाला आहे.

AIMIM vs BJP Lok Sabha
Khopoli murder case : मंगेश काळोखे प्रकरणात मोठी बातमी, राष्ट्रवादीचे दोन नेते जाणार तुरुंगात? न्यायालयाचा घेतला निर्णय!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com