

खोपोलीतील मंगेश काळोखे हत्या प्रकरणात मोठी न्यायालयीन घडामोड घडली आहे.
आरोपी सुधाकर घारे आणि भरत भगत यांचा अटकपूर्व जामीन अर्ज पनवेल सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.
या निर्णयामुळे दोघांवर अटकेची कारवाई होण्याची शक्यता वाढली आहे.
Raigad News : खोपोली नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांनी आपल्या पतीच्या हत्येवरून आज (ता. ६) बाराव्या दिवशी गंभीर आरोप करत शंका व्यक्त केली होती. त्यांचे पती शिवसेना कार्यकर्ते माजी नगरसेवक मंगेश काळोखे यांची २६ डिसेंबर २०२५ला निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. तर या प्रकरणात १२ जणांना अटक करण्यात आली असून अद्याप राष्ट्रवादीचे प्रवक्ते भरत भगत आणि जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांना अटक झालेली नाही. यावरूनच त्यांनी शंका उपस्थित करत पोलिस दबावात तपास करत असल्याचा आरोप केला आहे.
अशातच आता या प्रकरणात सुधाकर घारे आणि भरत भगत यांना पनवेल येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने धक्का दिला आहे. त्यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने नामंजूर केले आहेत.
त्यामुळे या दोघांच्याही अडचणीत मोठी वाढ झाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी तपास करत ही हत्या राजकिय वैमनस्यातून 20 लाखांची सुपारी देऊन करण्यात आल्याचे उघड केले आहे. तर या हत्ये मागील मुख्य सूत्रधार रवींद्र देवकर असल्याचेही पोलिस अधीक्षक आचंल दलाल यांनी स्पष्ट केले आहे.
पण या प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या भरत भगत आणि सुधाकर घारे यांचा थेट हात किंवा सहभाग दिसून येत नाही. पण पोलिस तपास करत असून लवकरच याबाबत माहिती समोर येईल असेही त्यांनी म्हटले होते. आता न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. यावरून पोलिस त्यांना का अटक करत नाहीत असा सवाल काळोखे कुटूंबियांनी उपस्थित केला आहे.
तसेच पोलिसांच्या तपासावरच संशय व्यक्त करत पोलिस कोणाच्या दबावाखाली काम करत आहेत. तपास संथ गतिने करत असल्याचा आरोप केला आहे. हे दोघेही राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी असल्याने या प्रकरणाला राजकीय वर्तुळातही वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.
या प्रकरणात पुण्यातून मारेकरी अटक झाल्यानंतरच मुख्य सूत्रधाराचे नाव समोर आले होते. ही हत्या राजकिय वैमनस्यातून करण्यात आली असून त्यासाठी 20 लाखांची सुपारी देण्यात आली होती. ज्याचा मुख्य सूत्रधार रवींद्र देवकर असल्याचे तपासात समोर आले होते. यादरम्यान पनवेल येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात भरत भगत आणि सुधाकर घारे यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. ज्यावर सोमवारी (ता.५) सुनावणी झाली.
या सुनावणीनंतर न्यायालयाने दोघांचेही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावले. यामुळे आता भगत आणि घारे यांच्या अडचणीत भर पडली असून त्यांना कधीही अटक होऊ शकते. पण सध्या हे दोघेही फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.
तर या प्रकरणात अटकेत असलेल्या एका आरोपीने या हत्येची सुपारी एका राजकीय पुढाऱ्याने दिल्याचे सांगितल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या हत्याकांडामुळे खोपोली आणि परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे. सध्या पोलिस अधिक तपास करत असून आरोपींच्या माहितीनंतर णखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Q1. मंगेश काळोखे हत्या प्रकरण कुठे घडले?
➡️ ही घटना रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे घडली.
Q2. अटकपूर्व जामीन कोणाचा फेटाळण्यात आला आहे?
➡️ सुधाकर घारे आणि भरत भगत यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला आहे.
Q3. हा निर्णय कोणत्या न्यायालयाने दिला?
➡️ पनवेल येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला.
Q4. या निर्णयाचा काय परिणाम होऊ शकतो?
➡️ आरोपींच्या अडचणी वाढून पोलिस अटक करण्याची शक्यता आहे.
Q5. प्रकरणाचा तपास सध्या कुठपर्यंत पोहोचला आहे?
➡️ तपास निर्णायक टप्प्यात असून पुढील कारवाई लवकरच अपेक्षित आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.