Ambadas Danve vs Jyoti Waghmare : अधिवेशनाच्या तोंडावर शिंदे गटाने का मागितला अंबादास दानवेंचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा?

Shivsena Politcial News : अंबादास दानवे यांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार राहिला नसल्याचे सांगत त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा, असा इशारा शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे यांनी दिला आहे.
Ambadas Danve, Joyti waghmare
Ambadas Danve, Joyti waghmare Sarkarnama

Mumbai News : राज्यातील विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन गुरुवारपासून सुरू होत आहे. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे. त्यातच आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे पीए व एक महिला अधिकारी यांच्या मोबाईलवरील आगामी काळात होत असलेल्या अधिवेशनातील लक्षवेधी संबधीचे संभाषण माध्यमांवर व्हायरल झाले आहे.

त्यामध्ये महिला अधिकाऱ्याचा मानसिक छळ करून त्यांच्यावर राजीनामा देण्यासाठी अंबादास दानवे यांच्याकडून दबाव आणला जात असल्याचे उघड झाले आहे. लक्षवेधी संबधीचे माध्यमांवर व्हायरल झालेले संभाषण पाहता अंबादास दानवे (Ambadas Danve) यांना या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार राहिला नसल्याचे सांगत त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा, असा इशारा शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे यांनी दिला आहे.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे पीए व एक महिला अधिकारी यांच्या मोबाईलवरील आगामी काळात होत असलेल्या अधिवेशनातील लक्षवेधी संबधीचे संभाषण माध्यमांवर व्हायरल झाले आहे. हे संभाषण ऐकल्यानंतर नक्कीच एक खात्री पटते की दानवेंच्या आडनावातच नव्हे तर त्यांच्या वृत्तीत ही दानव असल्याचे समोर आले आहे. त्या ऑडिओ क्लिपमध्ये लक्षवेधी विचारण्यासाठी दहा लाख रुपये घेतल्याची कबुली अंबादास दानवे यांनी त्या मध्ये दिलेली दिसत असल्याचा आरोप ज्योती वाघमारे (Joyti Waghmare) यांनी केला आहे.

विधीमंडळला पाठविण्यात आलेला हा प्रश्न गोपनीय ठेवण्यात यावा असे संकेत आहेत. मात्र, हा विचारण्यात आलेला प्रश्न महिला अधिकाऱ्याला पाठवण्यामागे दानवे व त्यांच्या पीएचा हेतू काय होता ? याद्वारे त्यांना खंडणी वसूल करायची होती का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मातोश्री व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे महिला अधिकाऱ्याचा मानसिक छळ केल्याच्या प्रकरणात गप्प का बरे आहेत. लक्षवेधीच्या माध्यमातून वसूल केल्या जात असलेल्या खंडणीचा वाटा मातोश्रीला दिला जातो का ? असा सवालही ज्योती वाघमारे यांनी उपस्थित केला आहे.

Ambadas Danve, Joyti waghmare
Jayant Patil News : जयंत पाटलांचा कॉन्फिडन्स वाढला; म्हणाले, लोकसभेपेक्षा 'मविआ'ला विधानसभेला मोठं यश मिळणार

दानवेंनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा

अंबादास दानवेंकडून लक्षवेधीचा प्रश्न विचारत महिला अधिकाऱ्याचा मानसिक छळ करीत आहेत. त्यासोबतच त्यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव आणत असल्याचे पुढे आले आहे. दानवे यांच्याकडून केला जात असलेला हा प्रकार लोकशाहीचा अपमान करणारा आहे, त्यामुळे दानवे यांनी विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा, त्यांना या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, असे डॉ. ज्योती वाघमारे यांनी स्पष्ट केले आहे.

Ambadas Danve, Joyti waghmare
Ambadas Danve On Devendra Fadnavis: 'आता जनाची नाही, तर मनाची ठेवा अन्..' ; अंबादास दानवेचं गृहमंत्री फडणवीसांवर टीकास्त्र!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com