Ambadas Danve On Devendra Fadnavis: 'आता जनाची नाही, तर मनाची ठेवा अन्..' ; अंबादास दानवेचं गृहमंत्री फडणवीसांवर टीकास्त्र!

Ambadas Danve vs Devendra Fadnavis : आता फडणवीसांना त्यांच्याच 'त्या' विधानाची आठवण अंबादास दानवेंनी करून देत राजीनामा मागितली आहे.
Ambadas Danve and Devendra Fadnavis
Ambadas Danve and Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Ambadas Danve demande resignation of Fadnavis : गाडी खाली एखादं कुत्रं आलं तरी राजीनामा मागितला जातो, असं म्हणत काही महिन्यांपुर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सुनावले होते. राज्यातील वाढती गुन्हेगारी, महिलांवरील अत्याचाराच्या घटना आणि गुंडाची दहशत यावरून विरोधकांनी देवेंद्र फडणवीस यांचा अनेकदा राजीनामा मागितला. पण त्यांनी याकडे दुर्लक्ष करत विरोधकांनाच यापुर्वी सुनावले होते.

आता पुन्हा एकदा राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे(Ambadas Danve) यांनी फडणवीस यांना उद्देशून 'जनाची नाही तर मनाची ठेवा अन् राजीनामा द्या, अशा तिखट शब्दांत टीका केली आहे. विद्येचे माहेर घर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्ह, ड्रग्ज, महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. पुण्याची बदनामी थांबवा, गुन्हेगारांना रोखा असे म्हणत विरोधकांनी पुन्हा एकदा गृहमंत्री फडणवीस यांना लक्ष्य केले आहे.

Ambadas Danve and Devendra Fadnavis
Pune Drug Case : पुण्यातला तो बार 'पतित पावन'ने फोडला!

एफसी रोडवरील नामांकित हॉटेलमध्ये तरुणांचा ड्रग्जची नशा करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली. त्यानंतर पुण्यातील लिक्वीड लिजर भागात उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत याप्रकरणात 9 जणांवर गुन्हा दाखल केला. यावरून अंबादास दानवे यांनी देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला.

ठाकरे गटाचे माजी नगरसवेक अभिषेक घोसाळकर(Abhishek Ghosalkar) यांची 8 फेब्रुवारी रोजी हत्या झाली होती. त्यानंतर काही दिवसातच उल्हासनगरमध्ये एका पोलीस ठाण्यात भाजप आमदाराने एका व्यक्तीवर गोळीबार केला होता. लागोपाठच्या या घटनांमुळे मुंबई हादरली होती. राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडली असा आरोप करत विरोधकांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची तेव्हा मागणी केली होती.

Ambadas Danve and Devendra Fadnavis
Ambadas Danve : अंबादास दानवे असं काय बोलले की खैरेंचा चेहरा पारच उतरला...

त्याला प्रत्युत्तर देतांना गाडीखाली कुत्रा आला तरीही विरोधक माझा राजीनामा मागतील, असे म्हटले होते. आता त्यांच्या या विधानाची आठवण करून देत अंबादास दानवे यांनी `आता जनाची नाही तर मनाची त्यांनी ठेवली पाहिजे. राज्यात दररोज कुठे ना कुठे गैरप्रकार, हत्या, महिलांवरील अत्याचार, अंमली पदार्थांचे सेवन, हिट अ‍ॅण्ड ड्राइव्हच्या घटना घडत आहेत.

विशेषतः पुण्यात या प्रकारांमुळे शहराची बदनामी होत आहे. राज्य सरकारने याची नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे. राज्याचे गृहमंत्र्यांनी आपले अपयश मान्य केले पाहिजे आणि पदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशा शब्दात अंबादास दानवे यांनी फडणवीसांवर टीका केली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com