Ambadas Danve On Budget : राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता कर्जमाफीची घोषणा मृगजळ ठरणार! अंबादास दानवेंनी दाखवला वास्तवाचा आरसा

Farm Loan Waiver Maharashtra : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावर अंबादास दानवेंनी टीका करत कर्जमाफीची घोषणा मृगजळ ठरण्याची शक्यता व्यक्त केली. राज्याची आर्थिक स्थिती, कृषी संकट आणि योजनांच्या निधीबाबत सरकारला सवाल उपस्थित केले.
Shiv Sena (UBT) leader Ambadas Danve reacting to Maharashtra Budget 2026 and raising questions over the government’s farm loan waiver announcement.
Shiv Sena (UBT) leader Ambadas Danve reacting to Maharashtra Budget 2026 and raising questions over the government’s farm loan waiver announcement.Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly Session 2026 : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (ता. 6) विधिमंडळात अर्थसंकल्प सादर केला. सत्ताधारी फडणवीस सरकारने घोषित केलेल्या शेतकऱ्यांच्या दोन लाखापर्यंतच्या कर्जमाफीबद्दल कौतुक केले आहे. तर विरोधी पक्षांनी राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता कर्जमाफीची घोषणा मृगजळ ठरण्याची शक्यता असल्याचे म्हणत वास्तवाचा आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अर्थसंकल्पावर भाष्य करताना राज्य सरकारवर टीका केली. कृषी क्षेत्राची वाताहत झालेली आहे. राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल कृषी क्षेत्राच्या दुरावस्थेवर शिक्कामोर्तब करतोय. शेती रसातळाला गेली असताना सरकार फक्त घोषणांचा पाऊस पाडतंय

घोषणा करण्यात आलेली कर्जमाफी ही मृगजळ ठरण्याची शक्यता व्यक्त करतानाच राज्याची आर्थिक स्थिती आणि प्रलंबित अनुदाने पाहता, जाहीर केलेली कर्जमाफी ही वस्तुस्थितीपेक्षा 'मृगजळ' ठरण्याचीच भीती अधिक आहे. मुख्यमंत्री महोदय, यावर स्पष्ट का बोलत नाहीत? असा प्रश्नही अंबादास दानवे यांनी उपस्थित केला आहे.

Shiv Sena (UBT) leader Ambadas Danve reacting to Maharashtra Budget 2026 and raising questions over the government’s farm loan waiver announcement.
Parbhani News : निर्ढावलेले कंत्राटदार, निधीचा खडखडाट; परभणी जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेचे तीनतेरा

शहरी झगमगाट, ग्रामीण भागातील अंधाराचा दाखला देत मेट्रो आणि विमानतळांसाठी भरघोस तरतूद, पण बळीराजाच्या झोळीत काय? हे बजेट केवळ 'शहरी महाराष्ट्रा' साठीच बनवलंय का? 7.5 एचपी पंपांचा जुमला म्हणत पंपांच्या सवलतीची घोषणा करताना हे पंप वापरणारे शेतकरी नेमके किती आहेत? याचा डेटा सरकारने का लपवला? की ही केवळ आकड्यांची खेळी आहे? असे म्हणत शंका व्यक्त केली.

Shiv Sena (UBT) leader Ambadas Danve reacting to Maharashtra Budget 2026 and raising questions over the government’s farm loan waiver announcement.
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचं भवितव्य काय? अनेक शंका-कुशंका; फडणवीसांच्या बजेटमधील विधानामुळे चर्चा रंगली

लाडकी बहीण योजनेचं गौडबंगाल सुरूच असून योजनेला लागणारे 45 हजार कोटी अर्थसंकल्पात दिसत नाहीत! मग हा निधी इतर खात्यांच्या तरतुदीला 'कात्री' लावून उभा करणार का? सरकारने याचं उत्तर द्यायलाच हवं, अशी मागणी अंबादास दानवे यांनी सरकारकडे केली आहे. बळीराजा आणि सामान्यांच्या डोळ्यात धूळफेक करणाऱ्या या अर्थसंकल्पाचा त्यांनी निषेधही केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com