Maharashtra Political News : येत्या हिवाळी अधिवेशनापूर्वी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे विरोधी पक्षनेतेपद जाणार असल्याचा दावा, भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी केला आहे. (Ambadas Danve News) सातत्याने सरकारविरोधात टीका करूनही उद्धव ठाकरे यांच्याकडे दानवेंची किंमत काय आहे? हे आता त्यांना कळाले असेल, असा टोलाही राणे यांनी लगावला आहे.
राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर (Shivsena) शिवसेनेच्या ठाकरे गटाने विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी मराठवाड्यातील अंबादास दानवे यांना संधी दिली होती. एवढे महत्त्वाचे पद पहिल्यांदाज विधान परिषदेवर निवडून आलेल्या दानवेंना दिल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
(Nitesh Rane) पण गेल्या कित्येक वर्षापासून छत्रपती संभाजीनगरचे शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून त्यांनी केलेले काम, संघटनात्मक बांधणी याची पावती म्हणून उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली होती.
शिंदे यांच्या नेतृत्वात झालेल्या बंडानंतर विधान परिषदेच्या सभागृहात आणि बाहेर रस्त्यावरही अंबादास दानवे यांनी सरकारविरोधातील भूमिका नेटाने निभावली. (Marathwada) राज्यातील अनेक विषय दानवे यांनी सभागृहात लावून धरत सरकारची कोंडी केल्याचेही अनेक वेळा पाहायला मिळाले. शिवसेना ठाकरे गटाची बाजू अंबादास दानवे राज्य पातळीवर जोरकसपणे मांडताना दिसतात.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पूर्वी शिवसेनेत आणि आता भाजपमध्ये असलेले नारायण राणे आणि त्यांची दोन्ही मुले संधी मिळेल तेव्हा उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका करत असतात. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून अंबादास दानवे अनेकदा त्यांना आपल्या भाषेत प्रत्युत्तरही देतात. त्यामुळे विशेषतः भाजपचे आमदार नीतेश राणे आणि दानवे यांच्यात खडाजंगी होताना दिसते.
यातूनच नीतेश राणे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना अंबादास दानवे यांचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद जाणार असल्याचा दावा केला आहे. डिसेंबरमध्ये होणाऱ्या नागपुरातील हिवाळी अधिवेशनापूर्वीच त्यांचे विरोधी पक्षनेतेपद जाईल, असे भाकीत वर्तवतानाच उद्धव ठाकरे यांच्याकडून दानवे यांचा केवळ वापर केला गेला.
काम संपले की ठाकरे कसे वापरून फेकून देतात हे आता दानवे यांना कळेल. नुकत्याच झालेल्या संघटनात्मक जबाबदाऱ्यांमध्ये अंबादास दानवे यांना साधे उपनेतेपदही दिले नाही, अशी टीकाही राणे यांनी केली आहे.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.