Supriya Sule : शरद पवार, उद्धव ठाकरेंवर टीका करणारे देशाचे गृहमंत्री बीड-परभणी प्रकरणावर गप्प का?

Supriya Sule On Amit Shah : परभणी-बीड येथील हत्या प्रकरणावर दोन शब्द बोलले असते तर निश्चितच महाराष्ट्राला, पिडित देशमुख, सूर्यवंशी कुटुंबाला दिलासा आणि आधार मिळाला असता.
sharad pawar | supriya sule | amit shah
sharad pawar | supriya sule | amit shah sarkarnama
Published on
Updated on

Sambhaji Nagar News: देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी शिर्डी येथे भाजपच्या अधिवेशनात काल केलेल्या भाषणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. या टीकेची राज्यभरात चर्चा होत असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी अमित शाह यांना बीड आणि परभणी हत्ये प्रकरणावर तुम्ही बोलायला हवे होते,असे म्हणत टोला लगावला.

लोकशाहीमध्ये कोणीही कोणाबद्दल बोलू शकतो,टीका करू शकतो. परंतु राज्यात आणि देशात गेल्या 35 दिवसांपासून ज्या बीड आणि परभणीतील हत्या प्रकरणावरून वातावरण तापले आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे,अशा विषयावर देशाच्या गृहमंत्र्यांनी अवाक्षरही काढून नये याचे आश्चर्य वाटते, असे (Supriya Sule) सुप्रिया सुळे म्हणाल्या.

sharad pawar | supriya sule | amit shah
Amit Shah on Sharad Pawar : 'आता मी शरद पवारांना सांगतो...' म्हणत अमित शहांनी थेट 'ही' आकडेवारीच मांडली अन् लगावला टोला!

महाराष्ट्रात येऊन केंद्रीय गृहमंत्री भाषण करतात आणि हेडलाईन शरद पवार,उद्धव ठाकरे यांची होते. यावरून या नेत्यांचे महत्त्व लक्षात येते. महाराष्ट्रातील जनतेने एवढ्या मोठ्या प्रचंड प्रमाणात बहुमत आणि यश दिले, तर मग तुम्ही महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था आणि परभणी-बीड येथील हत्या प्रकरणावर दोन शब्द बोलले असते तर निश्चितच महाराष्ट्राला, पिडित देशमुख, सूर्यवंशी कुटुंबाला दिलासा आणि आधार मिळाला असता,अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली.

sharad pawar | supriya sule | amit shah
MP Supriya Sule News : नैतिकता म्हणून तरी धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा!

गेल्या 35 दिवसांपासून सरपंच संतोष देशमुख आणि परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशी यांचे कुटुंबीय न्यायासाठी लढा देत आहेत,त्यांना न्याय मिळत नाही,अशा गंभीर विषयावर देशाचे गृहमंत्री महाराष्ट्रात येऊन दोन शब्दही बोलत नाहीत याला काय म्हणावे? शरद पवार,उद्धव ठाकरे यांच्यावर तुम्ही जरूर टीका करा लोकशाहीत याचा प्रत्येकाला अधिकार आहे. परंतु महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था आणि मराठवाड्यासारख्या बीड,परभणी जिल्ह्यात घडलेल्या हत्या प्रकरणावर जर तुम्ही काहीच बोलणार नसाल,तर मग जनतेने न्यायची अपेक्षा कुणाकडून करावी,असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला.

sharad pawar | supriya sule | amit shah
Sharad Pawar News : ''महाराष्ट्र शांत ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच, ही एकट्या मुख्यमंत्र्यांची नाही''

भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यामुळे बीडची बदनामी होत आहे,या राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या आरोपासंदर्भात सुप्रिया सुळे यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांना वाईट वाटणे सहाजिक आहे.मी त्यांच्या मताशी सहमत आहे,परंतु बीडची बदनामी ही कोणा व्यक्तीमुळे नाही तर वाल्मीक कराड यांच्यासारख्या प्रवृत्तीमुळे होत असल्याचा,पुनरुच्चारही सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com