Amit Shah Vs Devendra Fadnavis : अमित शाहांचा 'डबल गेम'; देवेंद्र फडणवीसांना रोखण्यासाठी एकनाथ शिंदेंना ताकद, खासदाराचा खळबळजनक दावा

Amit Shah Devendra Fadnavis Eknath Shinde : अमित शाहांच्या सूचनेनंतर रवींद्र चव्हाणांनी युतीसाठी एकनाथ शिंदेंसोबत चर्चा सुरू केली आहे. मात्र, देवेंद्र फडणवीसांची ताकद कमी करण्यासाठी ही रणनीती शाहांनी आखल्याची चर्चा आहे.
amit shah eknath shinde devendra fadnavis
amit shah eknath shinde devendra fadnavissarkarnama
Published on
Updated on

Sanjay Raut News : नगरपंचायत आणि नगरपरिषदेमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या विरोधात लढलेल्या भाजपचे सूर बदलला आहे. महापालिका निवडणुकीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेसोबत युती करण्याचे निर्देश अमित शाहांनी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना दिले आहेत. भाजपची ताकद वाढत असताना युतीसाठी शहांनी दिलेले निर्देश म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रोखण्याची रणनीती असल्याची चर्चा आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांनी दावा केला की,'अमित शाहांना देवेंद्र फडणवीसांना चेकमेट करायचे आहे. म्हणून ते एकनाथ शिंदेंना ताकद देत आहेत. त्यांना देवेंद्र फडणवीसांची ताकद वाढू द्यायची नाहीये, त्यांना दिल्लीच्या दिशेने येऊ द्यायचे नाहीये.'

ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण आणि मुंबईचे भाजप युनिट हे महायुतीच्या विरोधात आहेत. त्यामुळेच एकनाथ शिंदे हे रडगाणं घेऊन त्यांचे मायबाप अमित शाहांकडे गेले होते. शिंदे शहांकडे गेले तेव्हाच स्पष्ट झाले की शिंदेंची कुठेच ताकद नाही.

मुंबई महापालिकेत महायुती होणार

अमित शाह यांच्या सूचनेनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर आगामी महापालिका निवडणूक एकत्र लढणार सांगितले. मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली येथे युती होणार असल्याचे नेते सांगत आहेत. मात्र, नवी मुंबईबाबत अजुनही संभ्रम आहे. गणेश नाईक यांचा शिंदेंसोबत युती करण्यास ठाम विरोध असल्याचे बोलले जात आहे.

महाविकास आघाडी एकत्र

महायुतीमध्ये पुन्हा भाजप-शिंदे सूर जळत असताना महाविकास आघाडी देखील एकत्र येऊन लढण्याचा तयारी आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका, पुणे महापालिका, ठाणे महापालिका येथे महाविकास आघाडी एकत्र येत आहे. तर, मुंबईत ठाकरे बंधूंची आघाडी निश्चित मानली जात आहे. शरद पवार देखील ठाकरे बंधूंच्या युतीला पाठींबा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, पवारांनी मुंबईत देखील महाविकास आघाडीने एकत्र लढावे अशी भूमिका मांडली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com