Amit Thackeray Post : पंचतारांकित पॉलिटिक्सची पोलखोल! अमित ठाकरेंचा शिंदेंवर थेट हल्ला; नगरसेवक 'बेपत्ता' आहेत, प्रभागात कोण राजा?

Maharashtra ward-level politics: एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नगरसेवक एका पंचतारांकित हाॅटेलमध्ये ठेवण्यावरून अमित ठाकरे यांनी सोशल मीडियावर केलेली पोस्ट चर्चेत आहे.
Amit Thackeray post against Eknath Shinde
Amit Thackeray post against Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde Five Star Hotel Politics: एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या शिवसेनेचे नवनिर्वाचित 29 नगरसेवकांना वांद्रे येथील ताज लँड्स एन्ड या पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवलं. ठाकरे बंधू त्यांचे नगरसेवक फोडतील, या भीतीने एकनाथ शिंदे यांनी हे पाऊल उचलल्याचं शिंदेसेनेच्या नेत्यांकडून सांगितलं गेलं.

यावरून मनसेच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या पंचतारांकित पॉलिटिक्सवर घणाघात साधणारी पोस्ट सोशल मीडियात चांगलीच व्हायरल झाली आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप अन् एकनाथ शिंदे यांची युती होती. या निवडणुकीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेला फक्त 29 जागांवर यश मिळालं. शिंदे यांनी या नगरसेवकांचा मुक्काम वांद्रे इथल्या ताज लँड्स एन्ड या पंचतारांकित हॉटेलमध्ये हलवला. मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या नगरसेवकांची बेरीज केल्याशिवाय, भाजप प्रणित महायुतीला 114 ची मॅजिक फिगर गाठता येत नाही.

महायुतीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ठाकरे बंधू एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नगरसेवक फोडू शकतात, अशी भीती एकनाथ शिंदेंना सतावत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. याच भीतीपोटी एकनाथ शिंदेंनी त्यांच्या मुंबईतल्या (Mumbai) नगरसेवकांचा मुक्काम हॉटेलमध्ये हलवल्याचं बोलले जातं.

Amit Thackeray post against Eknath Shinde
ZP Elections : जे महाराष्ट्र सरकारला जमले नाही ते कर्नाटकने करून दाखवले; 'EVM'वरील संशयामुळे ZP निवडणूक बॅलेटवर!

एकनाथ शिंदे यांच्या पंचतारांकित पॉलिटिक्सवर मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी जोरदार निशाणा साधला आहे. अमित ठाकरे यांनी सोशल मीडियावर याबाबत पोस्ट शेअर करत, 'नगरसेवक ‘बेपत्ता’ आहेत?' असे म्हटले आहे.

Amit Thackeray post against Eknath Shinde
Bihar Bhavan Mumbai : मराठी अस्मितेवर घाला? मुंबईत ‘बिहार भवन’; ठाकरेंचा किल्लेदार संतापला- म्हणाले, ‘लाड खपवून..!’

अमित ठाकरे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, निकाल लागल्यावर खरं तर, लोकप्रतिनिधींनी आपल्या प्रभागात जाऊन जनतेचे आभार मानायला हवे होते, लोकांच्या समस्या सोडवायला सुरवात करायला हवी होती. पण दुर्दैवाने, ज्यांना जनतेने निवडून दिलंय, ते आज 'फाईव्ह स्टार हॉटेल'च्या बंद दाराआड ‘आनंदाने’ कैद आहेत.'

मतदानाचा अपमान

'याला नक्की कारण काय? स्वतःच्याच सहकाऱ्यांवरचा अविश्वास? स्वार्थी राजकारण? या राजकीय पळवापळवीमुळे ज्या सामान्य नागरिकांनी मतदान केले त्यांचा अपमान नाही का होतं? किती खाली घसरणार आहे महाराष्ट्राचे राजकारण?', असे अमित ठाकरे यांनी म्हटले.

खुर्ची वाचवण्यासाठी तमाशा

'या सगळ्या नाटकामध्ये ज्या पर्यटकांनी स्वतःचे कष्टाचे पैसे भरून हॉटेल बुकिंग केलं आहे, त्यांनाही सुरक्षेच्या नावाखाली त्रास सहन करावा लागतोय. लोकांच्या हितापेक्षा स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी सुरू असलेला हा तमाशा आणि जनतेच्या पैशाची, ही उधळपट्टी आता तरी थांबवा! ‘जमल्यास’… ज्या जनतेने तुमच्यावर विश्वास ठेवलाय तिच्यासाठी काहीतरी करा,' असेही अमित ठाकरे यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com