Amit Thackeray : '...त्यांचे हात पाय तोडून पोलिसांकडे द्या...', अमित ठाकरेंनी मनसैनिकांना थेटच सांगितलं!

Amit Thackeray MNS : अमित ठाकरे यांनी पालकांशी तसेच मनसेसैनिकांशी संवाद साधताना जर मुलींची छेड काढण्यात येत असेल तर छेड काढणाऱ्यांचे हात पाय तोड, असा सूचना केली.
Amit Thackeray
Amit ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Pune News : शालेय शिक्षणामध्ये हिंदी सक्ती विरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेतली त्यानंतर सरकारला देखील याबाबतच्या जीआर मागे घ्यावा लागला. त्यानंतर सातत्याने मराठीच्या भूमिकेवर मनसे आक्रमक असल्याची पाहायला मिळत आहे. अशातच पुण्यातील एका कार्यक्रमांमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी मनसैनिकांना काही सूचना केले आहेत.

अमित ठाकरे हे काल पुणे दौऱ्यावर होते. या दौऱ्यामध्ये त्यांनी मनसेने आयोजित केलेल्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी उपस्थित मनसे कार्यकर्ते आणि पालकांशी संवाद साधला. 'महिला आणि मुलींच्या छेडछाडीच्या घटना वाढत आहेत .त्यामुळे 'मुलींवर हात टाकणाऱ्यांचे हातपाय तोडून त्यांना पोलिसात दिले पाहिजे', असे अमित ठाकरे यांनी मनसैनिकांना सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये आपण राहतो त्यामुळे जे कोणी मुलीवर हात टाकतात त्यांनचे हात पाय तोडून पोलिसांकडे दिलात तरी चालेल. या राज्यामध्ये असं खपवून घेतलं जाणार नाही. आपली सत्ता नसेल तरी राज ठाकरे सत्तेत आहेत. असं देखील अमित ठाकरे म्हणाले.

Amit Thackeray
BJP Politics : कल्याण-डोंबिवलीत भाजप ठाकरेंना धक्का देणार! शिंदेंचीही अडचण वाढवणार; इन्कमिंग सुरू, महापौरपदासाठी स्वबळाचे संकेत

अमित ठाकरे म्हणाले, 'सर्वच पालकांना असं वाटत असतं की आपली मुलं शाळेत गेल्यानंतर सुरक्षित राहावीत. महाविद्यालयात गेल्यानंतर त्यांचा शिक्षण उत्तम पद्धतीने व्हावं अशा प्रकारच्या कोणत्याही अडचणी असल्यास पालकांनी बिनधास्तपणे मनसेकडे यावं. माझा देखील मुलगा आता शाळेत जाणार आहे. त्यामुळे मुलांना शाळेत पाठवताना पालकांची काय अवस्था असते याबाबत कल्पना आहे. शाळेत गेल्यानंतर काही घडलं तर आपल्याला उशिरा फोन आला तर अशी चिंता पालकांना सातत्याने वाटत असते त्यामुळे अशावेळी आम्ही तुमच्या सोबत आहोत.'

Amit Thackeray
Prajwal Revanna Rape Case : प्रज्वल रेवण्णा ‘कैदी क्रमांक 15528’; निकालानंतर मौन, तर तुरुंगात रात्रभर जागरण

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com