

DGCA CCTV footage : बारामती विमानतळाजवळ अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. या अपघातावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्यासह अन्य काही नेते व सामाजिक कार्यकर्त्यांकडून शंका उपस्थित केल्या जात आहेत. अपघाताआधी विमानातून कुणीतरी उडी मारली, विमानात बॉम्ब होता का? पायलट त्याचदिवशी कसा बदलला, अशा अनेक शंका व्यक्त होत आहेत.
आमदार मिटकरी यांच्याकडून आता सोशल मीडियातून अपघाताच्या चौकशी अहवालावर शंका उपस्थित करणारी सूचक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, आदरणीय दादांच्या विमान अपघाताचा थातुर मातुर चौकशी अहवाल यायला सुरुवात झाली आहे. दादा इतकी सामान्य व्यक्ती नव्हती, अहवाल सांगेल तांत्रिक चुक होती व वैमानिकाचा अंदाज चुकला व जनता मान्य करेल!
महाराष्ट्र पुरावा मागतोय, DGCA नी विमानतळावरील CCTV फुटेज प्रसारित करून दादाच्या आगमनापासून विमानात बसेपर्यंत प्रत्यक्षदर्शी पुरावा सादर करावा, अशी मागणी अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियातील पोस्टमधून केली आहे. यापूर्वीही त्यांनी अपघाताबाबत काही प्रश्न उपस्थित केले होते.
अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला, मग प्रत्यक्षात 5 मृतदेहच का सापडले? सहावी व्यक्ती कुठे गेली? Take-off आधी प्रवासी यादी digitally नोंदलेली असते, मग विसंगती का? एखादाही कागदाचा तुकडा जळालेला का दिसत नाही? एवढ्या वेळा पायलट का बदलले गेले?, असे प्रश्न मिटकरी यांनी केले होते. प्रश्न विचारणं म्हणजे अफवा नाही, असेही त्यांनी एका पोस्टमध्ये म्हटले होते.
उपमुख्यमंत्रीसारख्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तीसाठी अपघात व सुरक्षा दोषांचा इतिहास असलेल्या Learjet 45 विमानाची निवड कोणी व कोणत्या निकषांवर केली? तसेच अहवालांनुसार पूर्वी अल्कोहोल-संबंधित कारणांवर शासकीय कारवाई/निलंबनाची नोंद असलेल्या पायलट सुमित कपूर यांची ऐनवेळी नियुक्ती कोणाच्या निर्णयाने आणि कोणत्या मेडिकल-फिटनेस, CRM व सेफ्टी क्लिअरन्सवर करण्यात आली, याबाबत सविस्तर तांत्रिक स्पष्टीकरण काय?, असे सवालही मिटकरी यांनी यापूर्वी उपस्थित केले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.