

PM Modi viral response : भाजपमध्ये वयाची पंचाहत्तरी गाठणाऱ्या नेत्यांना सक्रीय राजकारणातून संन्यास घ्यावा लागतो, असे संकेत आहेत. माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुमित्रा महाजन यांच्यासह अशी अनेक उदाहरणेही आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मागील वर्षी १७ सप्टेंबरला ७५ वर्षे पूर्ण झाली. त्यामुळे ते राजकारणातून निवृत्त होणार का, अशी जोरदार चर्चा रंगली होती.
प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या काही नेत्यांकडूनही मोदींना पंचाहत्तरीची वारंवार आठवण करून दिली जात होती. परंतु मोदी तिसरी टर्म आणि त्यापुढेही पंतप्रधान राहतील, असे भाजप नेत्यांकडून ठामपणे सांगण्यात आले होते. मोदींनी आज एका नेत्याने ७५ वर्षांची आठवण करून दिल्याची आठवण सांगितली. निमित्त होते, ‘परीक्षा पे चर्चा’ या विद्यार्थी संवादाचे.
एका विद्यार्थ्याने मोदींना तुमच्या वाढदिवसाच्या दिवशीच माझाही वाढदिवस असल्याचे सांगितले. या विद्यार्थ्याने त्यांना दैनंदिन आयुष्य तसेच वयाच्या पंचाहत्तरीच्या अनुषंगानेही प्रश्न विचारला. त्याला उत्तर देताना मोदींनी वाढदिवसादिवशीची आठवण सांगितली.
मोदींनी सांगितले की, ‘’१७ सप्टेंबरला माझा वाढदिवस होता. त्यादिवशी एका नेत्याने मला पोन केला आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तो नेता म्हणाला, ‘तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, तुम्ही ७५ वर्षांचे झालात.’ त्यावर मी त्यांना म्हटले, अजून २५ वर्षे बाकी आहेत.’’ मोदींचे हे उत्तर ऐकून विद्यार्थ्यांना हसू आवरले आहे. त्यांच्यासोबत मोदीही हसू लागले.
विद्यार्थ्यांशी बोलताना मोदी पुढे म्हणाले की, मी जी वर्षे गेली ती मोजत बसत नाही. त्यामध्ये वेळ वाया घालवू नका. जे शिल्लक आहे, ते जगण्यासाठी वेळ द्या. तुम्हाला तुमचे आयुष्य मर्यादीत करायचे नाही. तुमचे आयुष्य अधिक चांगले करण्याकडे लक्ष द्या, असा माझा आग्रह आहे. तुम्हाला तुमचे आयुष्य शानदान बनवायचे आहे. शिक्षण हे त्यासाठी सशकत माध्यम आहे. याच माध्यमातून जीवनाला आकार द्यायचा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.