Amol Mitkari : अमोल मिटकरी बालिशपणे बडबडले, रोहित पवारांना काय बोलले...

Amol Mitkari Vs Rohit Pawar : आमदार रोहित पवार यांनी अजितदादा पवार गटाचे आमदार शरद पवार यांच्याकडे इच्छुक असल्याचे सांगितल्यावर अमोल मिटकरी यांनी त्यावर खालच्या पातळीवर प्रतिक्रिया दिली. आमदार पवार माझ्या लायकीचे नाही, असे मिटकरी यांनी म्हटले.
Amol Mitkari Vs Rohit Pawar
Amol Mitkari Vs Rohit Pawarsarkarnama

Amol Mitkari Politics : आमदार रोहित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी लायकी काढली आहे. 'रोहित पवार माझ्या लायकीचे नेते नाहीत, ते गल्लीबोळातील नेते आहेत', अशी बोचरी टीका आमदार अमोल मिटकरी यांनी केली. राजकारण असले तरी, नव्या दमाच्या नेत्याने कोणाची लायकी काढू नये, असे अलिखित संकेत असतात. मात्र अमोल मिटकरी यांनी रोहित पवारांबद्दल, अशा शब्दांत बोलून आरोप-प्रत्यारोपाची पातळी पुन्हा एकदा खाली आणली. तसे अमोल मिटकरी नवे राजकारणी आहे, हे देखील विसरू नये.

महायुती भाजपने केंद्रात सत्ता स्थापन केली. या सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला वाटा मिळाला नाही. आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटाला डिवचले. केंद्रात भाजपने अजित पवार गटाला एकही मंत्रीपद दिलं नाही. तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटातील काही आमदार शरद पवार यांच्या संपर्कात असून, ते लवकरच शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे प्रवेश करतील, असे रोहित पवार यांनी म्हटले होते. या अमोल मिटकरी यांनी रोहित पवारांवर बोचरी टीका केली आहे.

'केंद्रातील मंत्रीपदाबाबत काय बोलायचे ते आमचे (NCP) नेते अजितदादा पवार बोलतील. रोहित पवार हे गल्लीबोळातील नेते आहेत. ते माझ्या लायकीचे नाहीत. तुतारी गटाचे तीन आमदार अजितदादांच्या संपर्कात आहेत. पावसाळी अधिवेशनात अर्थसंकल्प सादर होण्याअगोदर मतदारसंघातील कामे करून घेण्यासाठी शरद पवार यांची ते साथ सोडतील. शदर पवार यांच्या गटातील तीन आमदार आमच्याकडे येताच, हवेत गोळीबार करणाऱ्या तुतारी गटाच्या नेत्यांना लवकरच गुड न्यूज देणार आहोत', असेही अमोल मिटकरी यांनी म्हटले.

Amol Mitkari Vs Rohit Pawar
Sharad Pawar : शरद पवारसाहेबांचे 'चपखल पेंटिंग'; रोहित पवारांनी भाजपसह विरोधकांना सूचक सुनावले!

अमोल मिटकरी यांनी काँग्रेसचे नेते विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावर देखील प्रतिक्रिया दिली. विजय वडेट्टीवार काँग्रेसमध्ये नाराज आहेत. लवकरच ते भाजपमध्ये प्रवेश करतील, असा दावा केला आहे. नाना पटोले यांचे वर्चस्व त्यांना सहन होत नसल्याने ते लवकरच निर्णय घेतील आणि काँग्रेस सोडतील, असेही अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.

अमोल मिटकरी यांच्या दाव्यावर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी विजय वडेट्टीवार अमोल मिटकरी यांना विचारून निर्णय घेतली असं वाटत नाही. ते आज, उद्या काँग्रेससोबतच राहतील. अमोल मिटकरी यांनी त्यांच्या पक्षाचं पाहावं, असा देखील टोला यशोमती ठाकूर यांनी लगावला.

Amol Mitkari Vs Rohit Pawar
Maharashtra Government : पावसाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार? कोणाचे वर्चस्व...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com